.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा लवकरच धमाका? अभिषेक, संजू आणि किशनसोबत मैदानात उतरणार? ते दोन पर्याय काय?

Vaibhav Suryavanshi in India Playing 11: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी साहेबांच्या देशात खेळण्याची दाट शक्यता आहे. आयर्लंडविरोधातील सामन्यात त्याला संधी देण्यात आली नसली तरी इंग्लंडमधील मैदानात त्याची बॅट तळपण्याची शक्यता आहे. IPL 2026 मध्ये त्याने 776 धावा चोपल्या होत्या. आता गोऱ्या साहेबांना तो कसा लोळवतो याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

Vaibhav Suryavanshi: साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा लवकरच धमाका? अभिषेक, संजू आणि किशनसोबत मैदानात उतरणार? ते दोन पर्याय काय?
वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौराImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 30, 2026 | 10:48 AM
Share

Vaibhav Suryavanshi in India Playing 11: आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे पानीपत झाले. भारतीय संघाला 0-2 असे झोपवण्यात आले. त्यामुळे टीम इंडियासमोर इंग्लंड संघाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 1 जुलैपासून 5 सामन्यांची टी20 मालिका होत आहे. आयर्लंडमधील सुपर फ्लॉप शोनंतर टीम इंडियात मोठा फेरबदलाची चर्चा सुरू आहे. ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशीविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. आयर्लंडमध्ये पहिल्या फळीने सपशेल हाराकिरी केली होती. त्यानंतर सुनिल गावस्कर यांच्यासह चाहत्यांनी वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी देण्याची वकिली केली आहे.

तर दुसरीकडे भारतीय संघाचे सहाय्यक कोच रायन टेन डोशेट यांनी वेगळा सूर आळवला. खेळाडूंना पूर्ण वेळ देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. वैभवला मैदानात उतरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल असा त्यांचा काहीसा सूर आहे. पण जर कर्णधार श्रेयस अय्यर याने निर्णय घेतला तर वैभव सूर्यवंशी याला संघात संधी मिळू शकते. धडाकेबाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासारखे दमदार खेळाडूंसोबत वैभव असल्यास काही चमत्कार होऊ शकतो.

काय आहेत पर्याय?

जर टीम इंडिया दोन्ही सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना कायम ठेवते आणि वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर संधी देते तर बदल दिसू शतको. वैभव सध्या कोणत्याही दबावाखाली नाही. तो इंग्लंडच्या गोलंदाजाला धुवून काढू शकतो. तो तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक खेळी खेळून संघाला एका मजबूत स्थितीत आणू शकतो. त्यामुळे त्याला तिसरा खेळाडू म्हणून मैदानात पाठवण्याची इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. यामुळे ईशान किशन चौथ्या तर कर्णधार श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर जातील. पुढे तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांचा क्रमांक येईल. इंग्लंडच्या खेळपट्टीवर हा बदल फायदेशीर ठरू शकतो.

दुसरा एक पर्याय आहे. त्यात वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर उतरवल्यास आणि संकटमोचक तिलक वर्माला याला दोन सामन्यात विश्रांती दिल्यास वैभवला संधी मिळेल आणि संघाला नवीन खेळाडू गवसता येईल. पण हा धोका संघ आणि कर्णधार अय्यर पत्करतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण टी20साठी अनुभवी खेळाडूंची गरज आहे. आयर्लंड विरोधातील हाराकिरीने संघाचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे.

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडिया

अभिषेक शर्मा, संजू सैमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव.

Follow Us
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात