AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: कसोटी मालिकेपूर्वी कोच राहुल द्रविडची रणनीती तयार, ओपनरला मिडल ऑर्डर फलंदाज बनवलं

टी-20 मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाचे पुढील लक्ष्य कसोटी मालिकेतही एकतर्फी विजय मिळवण्याचे आहे. 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत असून, त्यातील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे.

IND vs NZ: कसोटी मालिकेपूर्वी कोच राहुल द्रविडची रणनीती तयार, ओपनरला मिडल ऑर्डर फलंदाज बनवलं
Rahul Dravid
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 8:10 PM
Share

मुंबई : टी-20 मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाचे पुढील लक्ष्य कसोटी मालिकेतही एकतर्फी विजय मिळवण्याचे आहे. 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत असून, त्यातील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया मॅनेजमेंटने भारताच्या टेस्ट ओपनिंगमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. (India vs New Zealand: Shubman Gill will play in middle order)

सलामीवीर म्हणून सतत फ्लॉप होत असलेल्या शुभमन गिलला हटवण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला आहे. वृत्तानुसार, शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मधल्या फळीत खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल टीम इंडियाच्या सलामीची जबाबदारी सांभाळतील. रोहित शर्माला कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे मयंक अग्रवालला संधी मिळणार आहे. मयंक अग्रवाल इंग्लंड दौऱ्यावर एकही सामना खेळू शकला नाही. सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुलने सांभाळली होती. दरम्यान, दुखापतीमधून सावरुन शुभमन गिल संघात परतला आहे.

सलामीवीर शुभमन गिलला हटवण्याचा निर्णय योग्य?

शुभमन गिल प्रतिभावान खेळाडू असून त्याचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही, पण सलामीवीर म्हणून त्याच्या तंत्रात त्रुटी आहेत. गिलने आतापर्यंत 8 कसोटी सामन्यात 31.84 च्या सरासरीने 414 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतके आली आहेत. शुभमन गिल सुरुवातीच्या षटकांमध्ये स्विंगच्या विरोधात कमजोर वाटतो. पण त्याची फलंदाजी फिरकीपटूंविरुद्ध चांगली आहे त्यामुळे राहुल द्रविडने गिलसाठी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत विराट कोहली नाही, त्यामुळे रहाणे चौथ्या क्रमांकावर तर गिल पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. गिलला मधल्या फळीत हलवल्याने मयंक अग्रवाललाही संधी मिळेल, जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही बेंचवर बसून आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण. (विराट कोहली दुसऱ्या सामन्यात उपलब्ध असेल)

न्यूझीलंडचा कसोटी संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, ​​नील वॅगनर

इतर बातम्या

IND VS NZ: रोहित शर्माची हॅट्ट्रिक, विराट कोहली ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

रोहितचं अर्धशतक, हर्षल-अक्सरची उत्कृष्ट गोलंदाजी, भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा

हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार

(India vs New Zealand: Shubman Gill will play in middle order)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.