IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पाकिस्तानला लोळवण्यासाठी सज्ज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
India vs Pakistan Womens World Cup 2025 Live Match Score : आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना रविवारी हायव्होल्टज सामना पाहायला मिळणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना सलग चौथ्या रविवारी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने मेन्स टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी सलग 3 रविवारी आमनेसामने आले. भारताने या तिन्ही सामन्यात पाकिस्तानला लोळवलं. भारताने पाकिस्तानला 14, 21 आणि 28 सप्टेंबरला साखळी, सुपर 4 आणि अंतिम फेरीत पराभूत केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा रविवारी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात 30 सप्टेंबरला श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलाम दिली. त्यानंतर आता महिला ब्रिगेड सलग दुसर्या विजयासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर फातिमा सना पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे.
पाकिस्तानची या मोहिमेतील सुरुवात पराभवाने झाली. बांगलादेशने स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्ताना पराभूत केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात सलग दुसरा पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे. तर टीम इंडिया विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना केव्हा?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना कुठे?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स मॅच मोबाईल-लॅपटॉपवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध पाकिस्तान वूमन्स मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर पाहायला मिळेल.
