Ind vs Pak T20 World Cup match Weather Update : भारत-पाकिस्तान सामन्याआधी आली बॅडन्यूज, चाहत्यांची चिंता वाढली
India vs Pakistan T20 World Cup match pitch report : टी-20 वर्ल्ड कप सुरू आहे मात्र भारतीयांसाठी उद्या खऱ्या अर्थाने वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. भारत-पाक महामुकाबला होणार असून त्याआधी एक बॅडन्यूज समोर आली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील 19 वा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. हायव्होल्टेज सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलेलं असणार आहे. भारत-पाक सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. रविवारी संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र अशातच भारत-पाक सामन्यानआधी हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
न्यूयॉर्कमध्ये हा सामना तिथल्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 8 वाजता असणार आहे. हवामाना खात्याच्या ताज्या अपडेटनुसार भारत-पाक सामन्यावेळी टॉसदरम्यान 40 ते 50% पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर त्यानंतर दुपारी पुन्हा पावसाची एन्ट्री होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारत आणि पाक सामन्याच्या दिवशी न्यूयॉर्कमधील हवामानाच्या अंदाजानुसार तिथे 42% पाऊस, तापमान 25 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 58% राहण्याची शक्यता आहे. टॉसला वेळ झाला तरी सामना निर्धारित वेळेवरच होणार आहे.
भारत-पाक पिच रिपोर्ट
भारत आणि पाकिस्तान सामन्यावेळी पावसाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघांसाठी या मैदानावर खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे नव्या मैदानाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान दोन्ही संघांसमोर असणार आहे. भारताने पहिला सामना याच मैदानावर खेळला आहे तर पाकिस्तानचा या मैदानावर पहिलाच सामना आहे.
भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला अवघ्या 96 धावांमध्ये गुंडाळलं होतं, तर पाकिस्तानकडेही तगडे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे दोन्ही संघाची मदार गोलंदाजांवर असणार आहे. पण भारतीय फलंदाजांकडे या कोड्याचं उत्तर आहे की नाही हे रविवारी संध्याकाळी समजणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ/मोहम्मद अमीर, नसीम शाह, अबरार अहमद.
