AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL खेळून परदेशी खेळाडू नाही दमले, पण भारताच्या सीनियर खेळाडूंना हवी रेस्ट, बीचवर होतायत रिलॅक्स

टीम इंडियाची (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज (T 20 Series) सुरु आहे. रविवारी कटक येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले.

IPL खेळून परदेशी खेळाडू नाही दमले, पण भारताच्या सीनियर खेळाडूंना हवी रेस्ट, बीचवर होतायत रिलॅक्स
| Updated on: Jun 13, 2022 | 2:09 PM
Share

मुंबई: टीम इंडियाची (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज (T 20 Series) सुरु आहे. रविवारी कटक येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. भारताचा कुठलाही फलंदाज अर्धशतकी खेळी करु शकला नाही. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचा डाव गडगडला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने सहा विकेट गमावून 148 धावा केल्या. रोहित आणि विराट दोघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आराम देण्यात आलाय. विराट सध्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करतोय. रविवारी त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला होता. ज्यात तो कुठल्यातरी बीचवर एकटा बसलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो मालदीवमध्ये पत्नी आणि मुलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करतोय. याआधी रोहित शर्मा सुद्धा कुटुंबासोबत मालदीवमध्ये विश्रांतीसाठी गेला होता.

विराट आणि रोहितला काय अडचण होती?

आता प्रश्न हा निर्माण होतोय, आयपीएल खेळणारे परदेशी खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळतायत. मग विराट आणि रोहितला काय अडचण होती?. भारताविरुद्धच्या मालिकेत डेविड मिलर, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि ड्वेन प्रिटोरियस हे खेळाडू खेळतायत. मग रोहित-विराटला काय प्रॉब्लेम होता. दक्षिण आफ्रिकेचे हे खेळाडू आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळले होते. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु आहे. यात ट्रेंट बोल्ट, टिम साउदी आणि जॉनी बेयरस्टो सुद्धा खेळतात. हे खेळाडू सुद्धा आयपीएलमध्ये खेळले आहेत.

राशिद खान काय करतोय?

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेत राशिद खान खेळतोय. तो आयपीएल चॅम्पियन गुजराच्या संघाकडून खेळला. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या मालिकेत निकोलस पूरन वेस्ट इंडिजकडून खेळतोय. ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेतही मालिका सुरु आहे. डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूडही आयपीएलमध्ये खेळले.

रोहित-विराटची सुमार कामगिरी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नव्हता. रोहितही बॅटने फार काही करु शकला नव्हता. त्याने 14 सामन्यात 20 च्या सरासरीने 268 धावा केल्या. आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट चालली नाही. तीनवेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला. कोहलीने 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 155 पेक्षा जास्त होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.