AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला का पाठवलं? ऋषभची ही कसली कॅप्टनशिप? प्रश्न विचारताच अजब उत्तर

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज सुरु आहे. काल सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला. दिल्ली आणि कटक दोन्ही सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे.

IND vs SA: कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला का पाठवलं? ऋषभची ही कसली कॅप्टनशिप? प्रश्न विचारताच अजब उत्तर
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Jun 13, 2022 | 1:34 PM
Share

मुंबई: टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज सुरु आहे. काल सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला. दिल्ली आणि कटक दोन्ही सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. ऋषभ प्रथमच कॅप्टनच्या रोलमध्ये आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात फलंदाजीत क्रमावारीत एक वेगळाच चक्रावून टाकणारा बदल पहायला मिळाला. कटक येथे झालेल्या टी 20 मॅचमध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी फिनिशर दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh karthik) ऑलराऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. क्रिकेटच्या जाणकारांना या निर्णयाच आश्चर्य वाटलं. कारण त्यावेळी टीम इंडियाचा स्कोर कमी होता. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मग अशावेळी त्याला का रोखण्यात आलं. अक्षर पटेलने या सामन्यात 11 चेंडूत 10 धावा केल्या. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने वेगाने फटकेबाजी करुन टीमला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. दिनेश कार्तिकने 21 चेंडूत 30 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार होते.

तो सतत स्ट्राइक रोटेट करतो

ऋषभ पंतच्या या निर्णयावर जेव्हा प्रश्न निर्माण करण्यात आला, त्यावेळी टीम इंडियाकडून उत्तरही आलं. मॅच नंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये श्रेयस अय्यर म्हणाला की, “याबद्दल आम्ही आधी प्लानिंग केली होती. अक्षर पटेल फलंदाजीला आला, त्यावेळी सात ओव्हर्स बाकी होत्या. अक्षर पटेल असा खेळाडू आहे, जो सतत स्ट्राइक रोटेट करतो”

दिनेश कार्तिक अशी फलंदाजी करण्यात सक्षम

“ती वेळ अशी नव्हती की, तुम्ही जाऊन थेट पहिल्या चेंडूपासून फटेकबाजी कराल. दिनेश कार्तिक अशी फलंदाजी करण्यात सक्षम आहे. तो 15 ओव्हर्सनंतर टीम इंडियासाठी गरजेचा आहे. त्यावेळी कार्तिकला हिटिंगची संधी मिळते. फलंदाजीसाठी विकेट सोपी नव्हती, त्यामुळे दिनेश कार्तिकला सुद्धा सुरुवातीला अडचणी आल्या” असं श्रेयस अय्यर म्हणाला.

श्रेयस अय्यरच्या 40 धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 148 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 40 रन्स केल्या. पण टीम इंडियाचा या मॅचमध्ये पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.