AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: वारंवार नापास होणाऱ्या Rishabh Pant चा हेड कोच राहुल द्रविड यांनी घेतला क्लास

IND vs SA: Rishabh Pant एक आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. ऋषभ पंत फलंदाजी करत असताना समोरच्या गोलंदाजावर एक प्रकारच दडपण असतं. कारण ऋषभ केव्हाही, समोरच्या गोलंदाजाची लय बिघडवू शकतो.

IND vs SA: वारंवार नापास होणाऱ्या Rishabh Pant चा हेड कोच राहुल द्रविड यांनी घेतला क्लास
Rahul dravid-Rishabh pant Image Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई: Rishabh Pant एक आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. ऋषभ पंत फलंदाजी करत असताना समोरच्या गोलंदाजावर एक प्रकारच दडपण असतं. कारण ऋषभ केव्हाही, समोरच्या गोलंदाजाची लय बिघडवू शकतो. संघ अडचणीत असताना, अनेकदा त्याने उपयुक्त खेळी केली आहे. पण सध्या ऋषभ पंत आऊट ऑफ फॉर्म आहे. संघातील त्याच्या स्थानाबद्दल माजी क्रिकेटपटू (Cricketers) प्रश्न उपस्थित करत आहेत. पण ऋषभ कॅप्टन असल्यामुळे संघातील त्याच्या स्थानाला धोका नाहीय. ऋषभ फॉर्ममध्ये परतण आवश्यक आहे. अन्यथा पुढच्या सीरीजमध्ये (next Series) तो बेंचवर बसलेला दिसू शकतो. ऋषभला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ नेहमी प्लानिंग करतात. पण सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजमध्ये तो फ्लॉप आहे. ऋषभ पंत 3 टी 20 सामन्यात फक्त 40 धावाच करु शकला आहे.

सध्या त्याची जागा पक्की आहे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याच्या बॅटमधून फक्त दोन चौकार आणि दोन षटकार बरसले आहेत. मागच्या दोन सामन्यात पंतने प्रत्येकी पाच आणि सहा धावाच केल्या. त्याने खराब फटका खेळून आपली विकेट बहाल केली. सध्या ऋषभ पंत भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतोय. वनडे, टी 20 आणि कसोटी मध्ये त्याची जागा पक्की आहे. पण असंच सुरु राहिलं, तो संघातील स्थान गमावू शकतो.

कॅप्टनशिपवरही अनेक प्रश्न

आयपीएल 2022 मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन होता. पण त्याला आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडता आला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्येही त्याची अशीच सुमार कामगिरी सुरु आहे. त्याशिवाय त्याच्या कॅप्टनशिपवरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

केएल राहुलमुळे कॅप्टनशिपची संधी

ऋषभ पंतने कॅप्टन म्हणून घेतलेले काही निर्णय खटकले. यात युजवेंद्र चहलला त्याच्या चार षटकांचा कोटा पूर्ण करु न देणं, तसच इतरही काही निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. केएल राहुल जायबंदी झाल्यामुळे त्याला कॅप्टनशिप भुषवण्याची संधी मिळालीय. पण कॅप्टन आणि फलंदाज म्हणून ऋषभ छाप उमटवू शकलेला नाही.

राहुल द्रविड आता Action मोडमध्ये

पंतचा हा फॉर्म बघून खुद्द राहुल द्रविड आता Action मोडमध्ये आले आहेत. त्यांना पावल उचलावी लागली आहेत. राजकोट टी 20 पूर्वी राहुल द्रविड यांनी ऋषभ पंतसोबत बराच वेळ घालवला. त्याच्यासोबत चर्चा केली. राहुल द्रविड ऋषभ पंत सोबत त्याच्या शॉट सिलेक्शनवर चर्चा करताना दिसले. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या खेळाडूने आपल्या फलंदाजीवर मेहनत केली. ऋषभ पंत शिवाय श्रेयस अय्यरनेही नेट मध्ये अतिरिक्त सराव केला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.