IND VS SA: राहुल द्रविड ‘त्या’ कृतीमुळे ठरला हिरो, सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल

गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर पुजाराने कपडे चेंज करुन ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला. त्यावेळी हेड कोच राहुल द्रविड आपल्या जागेवरुन उठले व त्यांनी...

IND VS SA: राहुल द्रविड 'त्या' कृतीमुळे ठरला हिरो, सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 6:18 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनच्या (Centurion test) पहिल्या कसोटी सामन्यात काल मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पूजारा (Cheteshwar pujara) शून्यावर बाद झाला. एकाबाजूला केएल राहुलने शतक आणि मयांक अग्रवालने अर्धशतक झळकावले. पण त्याचवेळी पूजारा शून्यावर बाद होऊन तंबूत परतला. मयांक बाद झाल्यानंतर पुजाराने लगेच तंबुची वाट धरली. त्यामुळे संघावरील दबाव अचानक वाढला होता. खरंतर पुजाराकडूनही रहाणेप्रमाणे दमदार खेळीची अपेक्षा आहे. पण तो काल अपयशी ठरला. पहिल्याच चेंडूवर पूजारा बाद झाला. निगीडीच्या गोलंदाजीवर चेंडूने पुजाराच्या बॅटची कड घेतली व शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या खेळाडूने त्याचा सोपा झेल घेतला.

गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर पुजाराने कपडे चेंज करुन ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला. त्यावेळी हेड कोच राहुल द्रविड आपल्या जागेवरुन उठले व त्यांनी पुजाराची पाठ थोपटली. राहुल द्रविडच्या त्या कृतीनंतर पुजाराच्या चेहऱ्यावर हास्य होते. द्रविड आणि पूजाराचा ड्रेसिंग रुममधील तो व्हिडिओ व्हायरल होत असून क्रिकेट चाहत्यांनी राहुल द्रविडला सलाम केला आहे.

सेंच्युरियनचे मैदान नेहमीच अनलकी चेतेश्वर पूजारासाठी सेंच्युरियनचे मैदान नेहमीच अनलकी ठरले आहे. तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर 2018 मध्ये पूजारा शुन्यावर बाद झाला होता. पुजारा आतापर्यंतच्या करीअरमध्ये दोनदा गोल्डन डकवर बाद झाला आहे. दोन्हीवेळेला मैदान सेंच्युरियनचेच होते. पूजारा सध्या आऊटऑफ फॉर्म आहे. धावांच्या राशी उभारणाऱ्या पुजाराला मागच्या दोन वर्षात शतक झळकावता आलेले नाही. 2021 मध्ये पुजाराने 25 डावात 28.58 च्या सरासरीने 686 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या:

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम? विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती, फोटो काढताना दोन भाई गैरहजर; रामदास कदम यांच्या गैरहजेरीची चर्चा तर होणारच ठरलं! पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच; तारीखही ठरली

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.