AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना, ODI सीरीजला मुकणार?

भारत दक्षिण आफ्रिकेत तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी संघात या खेळाडूची निवड झाली होती.

IND vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना, ODI सीरीजला मुकणार?
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील (India vs South Africa) आगामी वनडे मालिकेला मुकू शकतो. भारत दक्षिण आफ्रिकेत तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी संघात या खेळाडूची निवड झाली होती. भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) कोरोनाची लागण झाली आहे. (India vs South Africa washington sundar corona virus positive south africa odi series doutful)

त्यामुळे त्याचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीज 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 22 वर्षांचा वॉशिंग्टन सुंदर अन्य खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. पण आता हे कठीण दिसतय. वॉशिंग्टन सुंदर सध्या मुंबईत आहे. इथूनच भारतीय वनडे संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. हे सर्व खेळाडू 12 जानेवारीला सकाळी रवाना होतील.

दहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर क्रिकबज या क्रिकेट वेबसाइटच्या वृत्तानुसार वॉशिंग्टन सुंदर मागच्या दहा महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. सुंदर मार्च 2021मध्ये शेवटचा इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. दुखापतीमुळेच तो आयपीएलही खेळला नाही. वॉशिंग्टन सुंदरचा अलीकडेच विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी तामिळनाडूच्या संघात समावेश करण्यात आला होता. तिथे त्याने दमदार कामगिरी केली. त्यानंतरच निवड समिती सदस्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुंदरची निवड केली. पण कोरोनामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुंदरचे पुनरागमन लांबू शकते.

असं आहे आंतरराष्ट्रीय करीयर वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत चार कसोटी, एक वनडे आणि 31 टी-20 चे सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये सहाविकेट आणि 265 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये एक विकेट आणि टी-20 मध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्याने कसोटी पर्दापण केले होते. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावून त्याने भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. वनडेमध्ये 2017 मध्ये पदार्पण केले पण त्यानंतर तो या फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही.

(India vs South Africa washington sundar corona virus positive south africa odi series doutful)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.