भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी वादाला तोंड, पाच खेळाडूंचा खेळण्यास नकार

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील भारतीय संघ श्रीलंका (India tour of Sri Lanka) दौऱ्यावर आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 

भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी वादाला तोंड, पाच खेळाडूंचा खेळण्यास नकार
India-vs-Sri-Lanka

कोलंबो : एकीकडे विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील टीम इंडिया (Indian Cricket Team) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील भारतीय संघ श्रीलंका (India tour of Sri Lanka) दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये चार ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तर त्याआधी श्रीलंका दौऱ्यात वन डे आणि टी 20 मालिका होत आहे. भारताचे दोन्ही मुख्य संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. मात्र श्रीलंकेतील काही माजी खेळाडू हे भारताने मुख्य संघ न पाठवल्याने नाराज आहे. (India vs Sri lanka 2021 controversy in Sri Lanka cricket Board five players refuses to play against upcoming series)

अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डातील वाद समोर आला आहे. पाच खेळाडूंनी या मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. एकीकडे भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयारीला लागल आहे. तर दुसरीकडे श्रीलंका संघातील वाद उफाळून आला आहे.

खरंतर श्रीलंक क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये कॉन्ट्रॅक्टचा हा वाद आहे. पाच खेळाडूंनी टूर कॉन्ट्रॅक्टरवर सही करण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही तर या पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या सराव सामन्यातही खेळण्यास नकार दिला. या खेळाडूंमध्ये लसिथ एंबुलडेनिया, लाहिरू कुमारा, विश्‍वा फर्नांडो, अशेन बंडारा आणि कासून रजिता यांचा समावेश आहे.

लंकन बोर्डाने या क्रिकेटपटूंना करारावर सही करुन बायो बबलमध्ये प्रवेश करण्यास बजावलं होतं. मात्र या खेळाडूंनी त्याला नकार दिला. जर या खेळाडूंनी सह्या केल्या तर त्यांचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो, असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ अॅश्ले डिसिल्व्हा यांनी सांगितलं.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दौऱ्याची सुरुवात वन डे मालिकेने होणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वन डे, तर 22, 24 आणि 27 जुलैला टी ट्वेण्टी मालिका खेळवण्यात येतील.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिका

पहिला वन डे – 13 जुलै
दुसरा वन डे – 16 जुलै
तिसरा वन डे – 18 जुलै

संबंधित बातम्या 

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

IND vs SL : युजवेंद्र चहल ते कुलदीप यादव, फिरकीच्या जोडीला दीपक-नवदीपचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?   

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे? 

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या या 2 मराठमोठ्या खेळाडूंना संधी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI