India vs Sri Lanka, 3rd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याला श्रीलंकेच्य़ा आर. प्रेमादासा मैदानावर काही वेळातच सुरुवात होणार आहे.

India vs Sri Lanka, 3rd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
India vs Sri lanka 3rd ODI live

कोलंबो : पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) विजय मिळवून श्रीलंका संघाला (Sri Lanka Cricket Team) मालिकेत व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे मालिका हातातून गमावलेली श्रीलंका टीम शेवटतरी किमान गोड व्हावा यासाठी आजच्या सामन्यात जीवाचे रान करणार हे नक्की. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्टेडियममध्ये (R Premadas Stadium) खेळवला जाणार आहे.

पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी तुफानी फलंदाजी केली. तर कर्णधार शिखर धवनने संयमी नाबाद 86 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी फार मेहनत करावी लागली. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत दिलासादायक फलंदाजी करत 275 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (53) याचे अर्धशतक आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या दिपक चहरच्या नाबाद 69 धावांनी भारताला विजयश्री मिळवून दिला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेतही भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेतली. आता तिसरा सामनाही दुसऱ्या सामन्याप्रमाणे रोमहर्षक होणार का? हे पाहावं लागेल.

सामना कुठे खेळविला जाणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, 23 जुलै रोजी कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि श्रीलंका संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.

हे ही वाचा :

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा

IND vs SL : श्रीलंकेला नमवत टीम इंडियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे

(India vs Sri Lanka 3rd Odi Live Streaming when and where to Watch online free in Marathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI