IND vs WI: आफ्रिकेत बेंचवर बसवलेल्या पुण्याच्या ऋतुराजवर राहुल-रोहित जोडी आता तरी विश्वास दाखवेल?

रोहित शर्माने (Rohit sharma) फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या मालिकेसाठी काल संघाची घोषणा करण्यात आली.

IND vs WI: आफ्रिकेत बेंचवर बसवलेल्या पुण्याच्या ऋतुराजवर राहुल-रोहित जोडी आता तरी विश्वास दाखवेल?
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:18 AM

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WA) आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माने (Rohit sharma) फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या मालिकेसाठी काल संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी अनेक नवीन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खान, राजस्थानचा दीपक हुड्डा आणि लेग स्पिनर रवी बिश्नोई यांना संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) सुद्धा आहे.

त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सुद्धा ऋतुराज गायकवाडची संघात निवड करण्यात आली होती. पण त्याला तिन्ही वनडे सामन्यांमध्ये एकदाही संधी मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड सलामीवीर आहे. पहिल्या वनडेमध्ये अनुभवी शिखर धवनला चान्स मिळाला. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले व 79 धावांची खेळी केली. भारताकडून तिन्ही वनडे मॅचमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे सलामीला ऋतुराजला संधी मिळू शकली नाही.

वेंकटेश अय्यर फ्लॉप ठरल्यानंतर तरी ऋतुराजला संधी मिळेल, असे वाटले होते. पण त्याला चान्स मिळाला नाही. आता मायदेशात होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत तरी ऋतुराजला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. येत्या सहा फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे.

ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स विजय हजारे वनडे टुर्नामेंटमध्ये पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चार शतक झळकावली आहेत. त्याने 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याशिवाय आयीपएल 2021 मध्ये सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत.

असा आहे वनडे संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सीराज, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

India vs west indies Will rahul dravid & rohit sharma show faith on Punes Ruturaj gaikwad & given him chance in team india

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.