AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final च्या मोठ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज, लवकरच न्यूझीलंडशी करणार दोन हात

भारतीय कसोटी क्रिकेट संघाला काही महिन्यांपूर्वीच न्यूझीलंड संघाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

WTC Final च्या मोठ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज, लवकरच न्यूझीलंडशी करणार दोन हात
विराट आणि केन
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 8:13 PM
Share

मुंबई: न्यूझीलंड संघाने टी20 विश्वचषक तर गमावला पण आता याच न्यूझीलंड संघाने काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेट प्रकारातील विश्वचषक असणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धा भारताला नमवत जिंकली होती. दरम्यान भारतीय संघाची या मोठ्या पराभवाची जखम अजूनही भरलेली नाही. त्यामुळे आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत ही जखम भरुन काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून यावेळी टी20 सामन्यांसह 2 कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत.

न्यूझीलंड संघासोबत भारताचे सामने 17 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. दरम्यान पहिले 3 टी20 सामने झाल्यानंतर दोन कसोटी सामने सुरु होतील. हे सामने भारतासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण मिळवण्यासाठी भारताला विजय गरजेचा असून WTC मधील पराभवही भरुन काढणं गरजेचं आहे. या दोन सामन्यात पहिल्या सामन्यावेळी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे संघात असणार आहे. नुकताच बीसीसीआयने कसोटी संघही जाहीर केला आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

पहिला सामना, 25 ते 29 नोव्हेंबर,  ग्रीन पार्क कानपूर, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.

दुसरा सामना, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम मुंबई, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.

काय घडलं होतं WTC Final मध्ये

WTC Final च्या सामन्यात नाणेफेक जिंकत न्युझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव 217 धावात आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझिलंडच्या संघाने पहिल्या डावात 249 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात न्यूझिलंडने भारतीय संघाला अवघ्या 170 धावांत गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला.  त्यामुळे न्यूझीलंडला 139 धावांचं माफक आव्हान मिळालं.जे केवळ 2 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करत न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(India will play two test matches against new zeland try to win and take revenge of WTC Final defeat)

Follow Us
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब