AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचीच मोहोर’, या पाकिस्तानी क्रिकटर्सचे भाकीत व्हायरल

ICC Women Cricket World Cup 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास घडवला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धुळ चारली. तर महिला क्रिकेट विश्वचषक भारतच जिंकणार असा दावा या पाक खेळाडूने केला आहे. त्याचे हे भाकीत व्हायरल झाले आहे.

'महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचीच मोहोर', या पाकिस्तानी क्रिकटर्सचे भाकीत व्हायरल
महिला क्रिकेट विश्वचषक
| Updated on: Oct 31, 2025 | 11:24 AM
Share

India Vs South Africa Final Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास घडवला. बलाढ्य ऑस्ट्रेलिया महिला संघाला पराभूत करून सर्वांनाच टीम इंडियाने धक्का दिला. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाशी भारतीय संघाचा सामना होईल. त्यापूर्वी हा सामना कोण जिंकणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women Cricket World Cup 2025) जिंकणार असल्याचा दावा पाक खेळाडूने केला आहे. त्याचे हे भाकीत व्हायरल झाले आहे.

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने भारत जिंकणार असल्याचा दावा केला आहे. भारतीय महिला टीमने या महिला विश्वचषक सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी बजावली आहे. टीम इंडियाला या विश्वचषकाचा कणखर दावेदार मानल्या जात आहे. भारतीय पुरुष संघाने आशिया कप जिंकला. आता भारतीय महिला वनडे वर्ल्ड कप जिंकणार. याशिवाय पुरुषांचा टी20 वर्ल्ड कप सुद्धा भारतच जिंकणार असल्याचा दावा दानिश कनेरिया याने केला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा हा संघ प्रबळ ठरण्याची दाट शक्यता त्याने वर्तवली.

पाकिस्तानच्या क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी

ऑस्ट्रेलिया हा एक बलाढ्य संघ होता. त्यांच्या महिला खेळाडू पुरुषांसोबत खेळतात. त्यांची तंदुरुस्ती अगदी जोरदार होती. ऑस्ट्रेलिया जोरदार सामान खेळला. तरीही भारतीय संघाने हा सामना स्वतःच्या खिशात घातला. दानिशने रोड्रिग्स आणि हरमनप्रीत कौरचे कौतुक केले. 338 धावांचे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे काम नव्हते. पण भारतीय महिला संघाने जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. या महिला खेळाडूंनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.

भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवले

पाकिस्तानच्या क्रिकेटरने पुढे सांगितले की, भारतीय संघाने सुरुवातीला त्याचे दोन गडी लवकर बाद झाल्यावरही मोठी कामगिरी केली. टीमने स्वतःला सांभाळले. ते मानसिक दबावाखाली आले नाही. खालच्या फळीतील खेळाडूंनी मोठी खेळी खेळली. त्यांनी फिटनेसची चुणूक दाखवली. गुरुवारी ऑस्ट्रेलिया संघाने 49.5 षटकात 338 धावांचा डोंगर उभारला. फोएबे लिचफील्डने 119, तर एश्ले गार्डनरने 63 धावा केल्या. भारतीय संघाने हे लक्ष्य 48.3 षटकात पूर्ण केले. जेमिमा रोड्रिग्सने 134 चेंडूत 14 चौकारासह नाबाद 127 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 89 धावा केल्या आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून या चषकावर नाव कोरण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.