India Women vs Sri Lanka Women Live Streaming: टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार
Ind W vs SL W World Cup Match Time: वूमन्स टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. भारतासमोर या सलामीच्या सामन्यात श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेची सांगता झाली. मेन्स टीम इंडिया अंतिम फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण नवव्यांदा आशिया कप जिंकला. त्यानंतर आता 30 सप्टेंबरपासून आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चामरी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत सर्व सविस्तर जाणून घ्या.
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामना केव्हा?
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामना मंगळवारी 30 सप्टेंबरला होणार आहे.
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामना कुठे?
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
इंडिया वूमन्स विरुद्ध श्रीलंका वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर हा सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
टीम इंडियाचा दबदबा
वूमन्स टीम इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला इंग्लंडमध्येच वनडे आणि टी 20 मालिकेत पराभवाची धुळ चारली. त्यानंतर महिला ब्रिगेडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाची मालिका खंडीत केली. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. त्यात भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होत असल्याने महिला ब्रिगेडला घरच्या परिस्थितीचा फायदा होणार आहे. त्यामुळे महिला ब्रिगेडच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
हरमनप्रीत आणि स्मृतीच्या कामगिरीकडे लक्ष
दरम्यान या स्पर्धेत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे. या जोडीने आतापर्यंत टीम इंडियासाठी बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. आता या दोघी या स्पर्धेत कशी सुरुवात करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
