विराट कोहलीवरच ‘गेम’ उलटला, रोहित शर्माला उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा प्लॅन फसला?

| Updated on: Sep 17, 2021 | 9:04 AM

भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक वेगळीच बातमी समोर येत आहे. विराट कोहलीला रोहित शर्माला उपकर्णधारपदावरून हटवायचे होते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

विराट कोहलीवरच गेम उलटला, रोहित शर्माला उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा प्लॅन फसला?
रोहित शर्मा आणि विराट कोहली
Follow us on

मुंबई :संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. 32 वर्षीय विराटने आपल्या ट्विटरवरुन याबाबतचं एक निवेदन जारी केलं आहे. ‘ऑक्टोबरमध्ये दुबईत होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर मी टी -20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे’, असं त्याने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या निर्णयानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद जाण्यााचा मार्ग खुला झाला आहे. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार म्हणून कोहलीच्या कारकीर्दीविषयी बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात होती की त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं जाऊ शकतं, विशेषत: आयपीएलमध्ये रोहित शर्माचा उत्कृष्ट रेकॉर्ड, ज्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून दिलंय.

रोहितला उपकर्णधारपदावरुन हटवायचं, कोहलीचा प्लॅन

34 वर्षीय रोहित वनडे आणि टी -20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. तो टी -20 कर्णधाराची भूमिका बजावण्याची आता शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्धच्या होणाऱ्या मालिकेत तो भारताचा कर्णधार म्हणून नव्या कारकीर्दीला सुरुवात करु शकतो. पण भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक वेगळीच बातमी समोर येत आहे. विराट कोहलीला रोहित शर्माला उपकर्णधारपदावरून हटवायचे होते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने हा रिपोर्ट दिला आहे. रिपोर्टनुसार, असं म्हटलं जातंय की रोहितला वनडे-टी -20 च्या उपकर्णधारपदावरून हटवण्याचा प्रस्ताव घेऊन कोहली निवड समितीकडे गेला होता. रोहित 34 वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला वनडेमध्ये उपकर्णधार आणि टी -20 मध्ये रिषभ पंतला कर्णधार केले पाहिजे, असं विराटचं म्हणणं होतं. तसं मत त्याने बीसीसीआयसमोर ठेवलं होतं. पण बीसीसीआयने रोहितची कॅप्टन्सी बघितली होती, त्याच्यातले नेतृत्वगुण हेरले होते. त्याचमुळे विराटची डाळ शिजली नाही, आणि विराटचा प्लॅन विराटवरच उलटलेला दिसून आला.

कोहलीने कुणाकुणाचा काटा काढला?

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, हा प्रस्ताव बोर्डाने नाकारला. कारण कोहलीला खरोखर कोणताही उत्तराधिकारी नको आहे, असा बीसीसीआयला विश्वास होता. बीसीसीआय कॉरिडॉरमधील अधिकारी सहमत झाले की, कोहलीला 2023 च्या विश्वचषकापर्यंत आपले कर्णधारपद वाचवायचे आहे. असंही दिसून आलं की, कोहलीने बर्‍याच लोकांना त्याच्या मार्गातून दूर केलंय. यामध्ये खेळाडू, सपोर्ट स्टाफ, सिलेक्टर आणि अगदी बोर्डमधील दिग्गजांचा समावेश होता.

2017 मध्ये कोहली कर्णधार बनला

महेंद्रसिंग धोनीच्या जागी कोहली 2017 मध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनला. कोहलीने 90 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 28 अर्धशतकांसह 3159 धावा केल्या आहेत. त्याने यापैकी 45 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि 27 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलाय तर 14 सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच्या विजयाची टक्केवारी 65.11 आहे. टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कर्णधार म्हणून त्याच्या शेवटच्या स्पर्धेत, कोहलीवर ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रचंड दबाव असेल.

(indian Captain Virat kohli Wanted to remove Rohit Sharma From Vice Captaincy Indian team )

हे ही वाचा :

विराट कोहलीचं वन डे कर्णधारपदही काढून घेणार, टीम इंडियात रातोरात खलबतं

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!