Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी; यॉर्कर किंगची धार कायम पण विजयी करण्यात अपयशी!
Indian Cricket Team Jasprit Bumrah : भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली पहिली कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर भारताचा वेगवान गोलंदाज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.

भारतीय क्रिकेट संघात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल पाहायला मिळाले. टीम इंडियाकडे एकसेएक आणि तोडीसतोड बॅट्समन होते आणि आताही आहेत. त्या त्या फलंदाजांनी स्वत:ला सिद्ध करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. भारतीय संघाच्या फिल्डींगमध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळाले. भारतीय संघाने कडक फिल्डिंगच्या जोरावर सामनेही जिंकले. मात्र भारताला हवा तसा आणि अपेक्षित वेगवान गोलंदाज पाहिजे होता. निर्णायक क्षणी सामना फिरवणाऱ्या गोलंदाजाच्या शोधात टीम मॅनेजमेंट होती. भारताची ही प्रतिक्षा आता यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराह याने काही वर्षांपूर्वी संपवली. बुमराहने टीम इंडियाला आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये धारदार बॉलिंगच्या जोरावर अशक्य विजय मिळवून...
