‘इन लव्ह विथ यु…’ भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पत्नीसह धबधब्याखाली धमाल!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे संपूर्ण संघ अजूनही इंग्लंडमध्येच असून सध्या आपल्या फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करतो आहे.

'इन लव्ह विथ यु...' भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पत्नीसह धबधब्याखाली धमाल!
इशांत शर्मा पत्नीसोबत

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC FInal) भारतीय संघाला न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. आता 4 ऑगस्टपासून टीम इंडिया इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे संपूर्ण संघ अजूनही इंग्लंडमध्येच असून आपल्या फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करतो आहे. कोणी गार्डन्समध्ये फिरतो आहे, कोणी फुटबॉल मॅच पाहतो आहे तर कोणी बच्चे कंपनी सोबत अॅम्युजमेंट पार्कमध्ये मजा करत आहे.  भारताच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) देखील त्याच्या पत्नीसोबत एका धबधब्याखाली मजा-मस्ती करत आहे. (Indian Cricketer Ishant Sharma Enjoying at Waterfall With Wife Video Went Viral)

इशांत शर्मा त्याच्या पत्नीसह कॉर्नवाल येथे सेंट नेक्टनच्या ग्लेन धबधब्याला भेट देण्यासाठी गेला होता. इशांत सोबत फलंदाज मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि त्याची पत्नीही होते. या सर्वांनी याठिकाणी धबधब्याचा भरपूर आनंद घेत मजामस्ती केली. त्यातील इशांत आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ इंग्लिश गाणे ‘इन लव्ह विथ यु…’ मागे लावून इशांतने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये इशांत आणि त्याची पत्नी धमाल मस्ती करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29)

14 जुलैला पुन्हा एकत्र येणार भारतीय संघ

WTC final मध्ये पराभवाची निराशा दूर करण्यासाठी सर्व संघ आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. रोहितही फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान ही सुट्टी संपवून 14 जुलैला सर्व संघाला एकत्र लंडनमध्ये जमाव लागणार आहे. तेथून इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी सर्व संघ नॉटिंघमला रवाना होईल. इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची सिरीज ही 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

हे ही वाचा :

IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

(Indian Cricketer Ishant Sharma Enjoying at Waterfall With Wife Video Went Viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI