‘पहला नशा, पहला खुमार’ गाण्यावर थिरकला शिखर धवन, पाहा VIDEO

श्रीलंका दौऱ्यावर भारताचे कर्णधारपद भूषवणारा शिखर धवन कायमच त्याच्या दमदार फलंदाजीने सर्वांचे मनोरंजन करतो. आतातर तो इन्स्टाग्राम रिल्स बनवूनही सर्वांची मनं जिंकत आहे.

'पहला नशा, पहला खुमार' गाण्यावर थिरकला शिखर धवन, पाहा VIDEO
शिखर धवन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. दरम्यान काही भारतीय खेळाडू या दौऱ्यात नसल्याने ते भारतात आपल्या विश्रांती करत मोकळा वेळ घालवचाना दिसत आहेत. यातीलच एक खेळाडू म्हणजे फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan). नुकताच श्रीलंकेच्या दौऱ्यावर कर्णधाराची भूमिका पार पाडणारा शिखर सध्या सोशल मीडियावर इन्स्टाग्राम रिल्स (Instagram Reels) बनवण्यात व्यस्त आहे. नुकतंच त्याने आमिर खानच्या जो जिता वोही सिकंदर चित्रपटातील ‘पहला नशा, पहला खुमार’ या गाण्यावर एक सुंदर व्हिडीओ बनवून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेत शिखरला कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. शिखरने ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली एकदिवसीय मालिके संघाला 2-1 ने विजय मिळवून दिला. पण दुखापती आणि कोरोनाच्या संकटामुळे टी-20 मालिकत मात्र भारताचा 2-1 पराभव झाला. पण संपूर्ण मालिकेत शिखरने प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत मिळून काही दमदार निर्णय घेतले ज्यामुळे त्याने सर्वांचीच मनं जिंकली. धांसू बॅटिंगने सर्वांचे मनोरंजन करणारा शिखर आता या रिलमध्ये कशी मजा करतोय तुम्हीच पाहा…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

‘कर्णधार’ शिखर धवन

शिखर धवनने 11 वर्षांपूर्वी भारताकडून एकदिवसीय संघात पदार्पण केले होते.  2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या धवनचे तेव्हा वय 24 वर्षे होते. 11 वर्षानंतर त्याला कर्णधार होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे इतक्या प्रतिक्षेनंतर कर्णधार होणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिखर भारतीय इतिहासातील संघाचा 25 वा कर्णधार असून सर्वाधिक वयात कर्णधार होण्याचा विक्रम शिखरने केला होता. दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ आणि हेमू अधिकारी यांना मागे टाकत शिखरने हा विक्रम केला आहे. धवन कर्णधारपद स्वीकारताना 35 वर्ष 225 दिवसांचा आहे. याआधी हेमू अधिकारी हे 35 वर्ष आणि मोहिंदर अमरनाथ 34 वर्ष 37 दिवसांचे असताना कर्णधारपद स्वीकारलं होतं.

हे ही वाचा

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(Indian Cricketer Shikhar Dhawan insragram reel on pehla nasha song went viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI