IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे भारताला आतापर्यंत 154 धावांची आघाडी मिळाली आहे.

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 11:36 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा चौथा दिवस होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 364 धावा जमवल्या तर त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने काल तिसऱ्या सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडला या डावात 27 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे भारताला आतापर्यंत 154 धावांची आघाडी मिळाली आहे. (IND vs ENG: Ajinkya Rahane fifty, India 181 for 6 at the end of day 4 of Lords Test)

दुसऱ्या डावात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या डावात 5 धावा करुन बाद झाला. पाठोपाठ 21 धावा करुन रोहित शर्मादेखील माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 20 धावांवर असताना सॅम करनची शिकार ठरला. भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेल्यानंतर भारताचा डाव भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने सावरला. या जोडीने तब्बल 297 चेंडूत शतकी भागीदारी रचून भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. ही जोडी आजचा पूर्ण दिवस नाबाद राहील असं वाटत असताना मार्क वूडने एका उत्कृष्ट चेंडूवर चेतेश्वर पुजाराला बाद केलं. त्याने 45 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर काही वेळाने रहाणेदेखील मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक फटकावलं. त्याने 146 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजादेखील 3 धावा करुन बाद झाला. दिवसअखेर भारताने 82 षटकांमध्ये 181 धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडकडून मार्क वूडने 3 तर मोईन अलीने 2 विकेट घेतल्या. तसेच सॅम करनने विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ अर्धा तास आधीच थांबवण्यात आला. रिषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर नाबाद आहेत.

इंग्लंडचा पहिला डाव

दरम्यान, काल तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंडकडून या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक 180 धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने 57 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉनी बर्न्स याने काल 49 धावांची खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली होती. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा चांगलाच कस लागला. रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी फार वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. मात्र आज पुन्हा एकदा रुटने भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.

भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याचा निर्णय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चुकीचा ठरवला. रोहितने आक्रमक फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली, तर राहुलने त्याला साथ दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला फारसे काही करता आले नाही आणि तो स्वस्तात बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर राहुलने कोहलीसह भारतीय डावाची धुरा सांभाळली आणि या दरम्यान राहुलने लॉर्ड्सवर आपले पहिले शतक झळकावले. विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 42 धावांचे योगदान दिले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने 40 धावांचे योगदान दिले. तर रिषभ पंतने 37 धावा जमवल्या. 129 धावांची खेळी करुन राहुल बाद झाला. राहुल-रोहित, कोहली आणि जाडेजाने दिलेल्या धावांच्या योगदानामुळे भारताला पहिल्या डावात 364 धावा उभारता आल्या.

इतर बातम्या

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर

टीम इंडियाच्या सुपरस्टार खेळाडूची निवृत्ती, स्वातंत्र्यदिनी क्रिकेट सोडण्याची घोषणा, आजही काळजात धस्स होतं!

Ind vs Eng : दिनेश कार्तिक म्हणाला, ‘वाढीव दिसताय राव’, आता मोहम्मद सिराजकडून ‘अपना स्टाईल’मध्ये उत्तर!

(IND vs ENG: Ajinkya Rahane fifty, India 181 for 6 at the end of day 4 of Lords Test)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.