श्रीलंका दौऱ्यानंतर BCCI कोणाला काढणार? समोर आली आतली मोठी बातमी!

भारतीय क्रिकेटपटूंना गेल्या काही दिवसांपासून दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. असं असताना एका पाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यानंतर एक मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

श्रीलंका दौऱ्यानंतर BCCI कोणाला काढणार? समोर आली आतली मोठी बातमी!
श्रीलंका दौऱ्यानंतर BCCI कोणाला काढणार? समोर आली आतली मोठी बातमी!
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2026 | 4:27 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतील निकालावर भारताचं अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा मॅच विनर गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून आऊट झाला आहे. जसप्रीत बुमराहची या स्पर्धेसाठी निवड झाली होती पण पुन्हा दुखापतग्रस्त झाला. पूर्ण फिट नसल्याने त्याचं नाव श्रीलंका दौऱ्यातून मागे घेतलं आहे. इतकंच काय तर साई सुदर्शन, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी हे देखील दुखापतग्रस्त आहे. साई सुदर्शन खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. टीम इंडियाची अशी स्थिती पाहून बीसीसीआय आणि टीम इंडिया व्यवस्थापन खूपच नाराज आहेत. त्यामुळे लवकरच कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे फिजिओथेरेपिस्ट कमलेश जैन यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.

कमलेश जैन यांना काढणार?

कमलेश जैन हे 2022 पासून टीम इंडियाचे फिजिओथेरेपिस्ट आहेत. पण त्यांच्या कामगिरीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. इंग्लंड दौऱ्यातही असंच घडलं होतं. दुखापतीमुळे टीम इंडिया आपली बेस्ट प्लेइंग 11 मैदानात उतरवू शकली नाही. त्यामुळे भारताला इंग्लंडमध्ये पराभवाची धूळ खावी लागली. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसध्ये खेळाडू फिट होण्यासाठी जातात आणि त्यानंतरच त्यांना क्लियरन्स मिळतं. पण टीम इंडियात येताच अनफिट होतात. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल वैतागले आहेत. त्यांनी याबाबतची नाराजी उघडपणे व्यक्तही केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, संघ व्यवस्थापन श्रीलंका दौऱ्यानंतर कमलेश जैन यांच्याबाबत आपलं मत बीसीसीआयकडे व्यक्त करणार आहे.

खेळाडूंचा सीओईवरील विश्वास झाला कमी!

टीम इंडियात दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंची यादी खूप मोठी आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी हे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तर वरूण चक्रवर्ती, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली आहे. हर्षित राणा देखील दुखापतीमुळे संघाच्या आत बाहेर असतो. त्यामुळे खेळाडू फिट अँड फाईन होत असल्याने सहाजिकच कारवाई होणं निश्चित आहे. इतकंच काय तर काही मोठ्या खेळाडूंचा सीओईवरील विश्वास उडाला आहे. त्यांनी सेंटर ऑफ एक्सीलेंस ऐवजी विदेशी स्पेशालिस्टकडून दुखापतीवर सल्ला घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एका बाजूने बीसीसीआयचं नाचक्की झाल्यासारखं आहे. कारण जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती असताना अशा सुविधांमुळे नाकं कापल्यासाखी भावना आहे. त्यामुळे कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us