AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : Odi World Cup आधी टीम इंडियाला टेन्शन, ट्राय सीरिजनंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर म्हणाली….

Harmanpreet Kaur India Women vs Sri Lanka Women Final Post Match Presentation : भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत ट्राय सीरिज जिंकली. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने चिंता व्यक्त केली.

IND vs SL : Odi World Cup आधी टीम इंडियाला टेन्शन, ट्राय सीरिजनंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर म्हणाली....
Harmanpreet Kaur Women Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: May 11, 2025 | 10:00 PM
Share

वूमन्स टीम इंडियाने रविवारी 11 मे रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये वनडे ट्राय सीरिज फायनलमध्ये यजमान श्रीलंकेचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने श्रीलंकेवर 97 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 343 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेचा डाव 48.2 ओव्हरमध्ये 245 धावांवर आटोपला. टीम इंडियाने अशापक्रारे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील 31 वा विजय मिळवला. मात्र या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने खेळाडूंच्या दुखापतीवरुन चिंता व्यक्त केली. हरमनप्रीतने सामन्यानंतर वेगवान गोलंदाजांना सातत्याने होत असलेल्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली. सपोर्ट स्टाफ यावर वनडे वर्ल्ड कपआधी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरमनप्रीतने सांगितलं.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

“मला संपूर्ण टीमचा, खास करुन फलंदाजांचा अभिमान आहे. आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा विचार करत होतो. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याबद्दल समाधानी आहोत. आम्ही कधीही सुधारणा करणं थांबवू शकत नाही. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही बाबतीत आणखी सुधारणा करुन चांगलं करु शकतो”, असं हरमनप्रीतने म्हटलं.

गोलंदाजांच्या दुखापतीवरुन हरमनने काय सांगितलं?

“आमचे वेगवान गोलंदाज जखमी होत राहतात. गोलंदाजांच्या दुखापतीबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. कोच त्यावर मेहनत घेत आहेत”, असं हरमनने सांगितलं.

सांगलीकर स्मृतीचं कौतुक

तसेच हरमनने या विजयानंतर ओपनर स्मृती मंधाना हीचं कौतुक केलं. “स्मृती आणि माझ्या व्यतिरिक्त इतरांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते पाहणं आनंददायी होतं. स्नेह राणाने अप्रतिम बॉलिंग केली”, असं हरमनने म्हटलं. स्मृती आणि स्नेह या दोघींनी अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. स्मृतीने 101 बॉलमध्ये 116 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 300 पार मजल मारता आली. तर त्यानंतर स्नेह राणा हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेत श्रीलंकेला गुंडाळण्यात मोठं योगदान दिलं.

स्मृती-स्नेहचा सन्मान

दरम्यान स्मृती आणि स्नेह राणा या दोघींनी ट्राय सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यासाठी दोघींना सन्मानित करण्यात आलं. स्नेह हीने या मालिकेत 15 विकेट्स घेतल्या. त्यासाठी स्नेहला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर स्मृतीला शतकी खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ने गौरवण्यात आलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.