5

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!

रणनितीवर बोलताना संजू सॅमसन म्हणाला, या स्पर्धेची गरजच आक्रमता ही आहे. त्यानुसार आम्ही आक्रमक होऊनच खेळू पण संयम ढळू देणार नाही. Rajasthan Royals Captain Sanju Samson

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!
Sanju Samson
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 1:25 PM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थान संघात नव्याने बदल होतायत. नियमित कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) राजस्थानने रिलीज करुन संघातील नव्या दमाचा खेळाडू विकेट कीपर फलंदाज संजू सॅमसनकडे (Sanju Samson) संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसंच श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संघकाराला (Sanju Samson) डायरेक्टर ऑफ क्रिकेट बनविण्यात आलं आहे. संघात हे जसे ने बदल केले जातायत तसेच बदल आता संघातील इतर खेळाडूंना संधी बाबचही करण्याचा मानस कर्णधार संजू सॅमसनने बोलून दाखवला आहे. (IPL 2021 Rajasthan Royals Captain Sanju Samson Press Conference over IPL team performance)

आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली. अगदी पहिलंच पर्व राजस्थानने आपल्या कामगिरीने गाजवलं. पहिल्या पर्वाचं जेतेपद राजस्थानने मिळवलं. मात्र त्यानंतर राजस्थानला चमकदार कामगिरी करता आली नाही. पाठीमागच्या 12 वर्षांत राजस्थानला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायला देखील संघर्ष करावा लागला आहे. अशात आता संघात नव्या बदलाचे वारे वाहत आहेत. त्यानुसार संघाला जर स्थैर्य द्यायचं असेल तर खेळाडूंची संधी मिळाली पाहिजे, अशा मतापर्यत संघ व्यवस्थापन पोहोचलं आहे.

खेळाडूंना संधी मिळायला हवी

संघ पूर्ण क्षमतेने मैदानात उतरायला हवा. कारण संघात अनेक पर्याय आहेत. पर्यायी खेळाडूंना संधी मिळायली हवी, असं सांगताना संजू सॅमसन म्हणाला, मी आणि संघकारा (संगा) टीमला सर्वश्रेष्ठ कॉम्बिनेशन देण्यास तयार आहोत. यावेळी संघाला स्थिरता देण्याचा आमचा प्रयत्न असेल. ओपनिंग जोडी काय असेल कोण असेल हे आमचं ठरलं नाही, पण संघाला सर्वश्रेष्ठ देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आक्रमक खेळ ही आयपीएलची गरज

रणनितीवर बोलताना संजू सॅमसन म्हणाला, या स्पर्धेची गरजच आक्रमता ही आहे. त्यानुसार आम्ही आक्रमक होऊनच खेळू पण संयम ढळू देणार नाही. शेवटी संघाला जिंकवून द्यायचं म्हटल्यावर सगळ्यांनी परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की यंदाच्या वेळी आमचा संघ चांगली कामगिरी करेल.

(IPL 2021 Rajasthan Royals Captain Sanju Samson Press Conference over IPL team performance)

हे ही वाचा :

IPL 2021 RR vs PBKS Head to Head Records: प्रतिस्पर्धी संघांत 21 मॅच, राजस्थान विरुद्ध पंजाब, कुणाचा पगडा भारी राहणार?

IPL 2021 RR vs PBKS live streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021: अब्दुल समदच्या षटकारांनी डेव्हिड वॉर्नरला अत्यानंद, कर्णधाराकडून थाबासकीची थाप, पाहा व्हिडीओ

Non Stop LIVE Update
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ