IPL 2021 : ‘नाराज मत होना, हार के बाद जीत हैं!’ असं तर विराट कोहली रिषभला सांगत नसेल ना?, पाहा व्हिडीओ

दिल्लीने सामना गमावल्यानंतर रिषभ पंत खूपच नाराज झाला होता तर हेटमायर देखील दु:खी चेहऱ्याने पीचवर बसला होता. एरव्ही विजयाचा आनंद जोरात साजरा करणारा विराट लगोलग रिषभ आणि हेटमायर जवळ गेला आणि त्यांना धीर दिला.  Virat Kohli Couselling Rishabh Pant

IPL 2021 : 'नाराज मत होना, हार के बाद जीत हैं!' असं तर विराट कोहली रिषभला सांगत नसेल ना?, पाहा व्हिडीओ
दिल्लीने सामना गमावल्यानंतर नाराज रिषभची विराट समजूत काढत होता...
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 1:00 PM

अहमदाबाद : नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध बंगळुरु (RCB vs DC ) यांच्यात अतिशय रोमांचक सामना बघायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर एका धावेने सनसनाटी विजय मिळवला. दिल्लीकडून पीचवर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि शिमरन हेटमायर (shimron hetmyer) हे दोघेही असताना बंगळुरुने दिल्लीला विजय मिळू दिला नाही हे विशेष…! दिल्लीने सामना गमावल्यानंतर रिषभ पंत खूपच नाराज झाला होता तर हेटमायर देखील दु:खी चेहऱ्याने पीचवर बसला होता. एरव्ही विजयाचा आनंद जोरात साजरा करणारा विराट कोहली (Virat Kohli) लगोलग रिषभ आणि हेटमायर जवळ गेला आणि त्या दोघांनाही धीर दिला. विराटने रिषभ आणि हेटमायरची समजूत काढली. सामन्यानंतर विराटचे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. साहजिक ‘नाराज मत होना दोस्त, हार के बाद जीत हैं!’ असं तर विराट कोहली रिषभला सांगत नसेल ना?, असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला. (IPL 2021 RCB vs DC Rishabh pant Sad After Loosing the match Virat Kohli And mohammed siraj Came Forward Couselling Rishabh)

डिव्हिलियर्सची बॅट तळपली, बंगळुरुकडून 172 धावांचं टार्गेट

बंगळुरुच्या डावांत एबी डिव्हिलियर्सने जोरदार फटकेबाजी केली. विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल लवकर बाद झाल्यानंतर एबीने डावाची सूत्रं आपल्या हातात घेतली त्याने शेवटपर्यंत पीचवर ठाण मांडलं. त्याच्या या सुंदर खेळीत त्याने 75 धावा ठोकल्या. या खेळीला त्याने 3 चौकार तर 5 षटकारांचा साज चढवला. त्याच्या खेळीच्या जोरावर बंगळुरुने 171 धावा केल्या.

रिषभची संयमी खेळी, हेटमायरची फटकेबाजी

बंगळुरुने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी लवकर माघारी परतले. साहजिक कर्णधार रिषभ पंतला बॅटिंगसाठी मैदानात यावं लागलं. त्याने कुठलीही घाई न करता संयमी फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला शिमरन हेटमायर बंगळुरुच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने केवळ 25 चेंडूत 53 धावा ठोकल्या.

शेवटच्या ओव्हर्सचा ड्रामा

शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला 14 रन्सची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजने अफालातून बोलिंग केली. त्याने टप्पा आणि दिशा सोडली नाही तसंच त्याची तादक असलेले यॉर्करही खूप नजाकतीने टाकले. तरीही पंतने त्याला दोन चौकार ठोकले. अखेर दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्सच करता आल्या. शेवटी बंगळुरुचा 1 रन्सने विजय झाला. यावेळी रिषभ पंत खूपच निराश झाला होता तर विराटला गगनात आनंद मावत नव्हता. पण सामना गमावल्यानंतर रिषभ पंत खूपच नाराज झाला होता तर हेटमायर देखील दु:खी चेहऱ्याने पीचवर बसला होता. एरव्ही विजयाचा आनंद जोरात साजरा करणारा विराट लगोलग रिषभ आणि हेटमायर जवळ गेला आणि त्यांना धीर दिला.

(IPL 2021 RCB vs DC Rishabh pant Sad After Loosing the match Virat Kohli And mohammed siraj Came Forward Couselling Rishabh)

हे ही वाचा :

IPL 2021 CSK vs SRH Live Streaming: चेन्नई विरुद्ध हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

Video : रिषभला आऊट दिलं, विराट भलताच खुश झाला, अंपायर्सनी निर्णय बदलताच चेहरा बघण्याजोगा झाला!

IPL 2021 : ‘छोटा  पॅकेट बडा धमाका’, पृथ्वी जोमात, विराट-रोहित कोमात, सोबत तोडले दोघांचेही रेकॉर्ड!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.