IPL 2021 : ज्या गोलंदाजांना धू-धू धुतलं, आता त्यांच्याच बचावासाठी रिषभ पंतला सिक्सर मारावे लागणार!

कसोटी असो वा एकदिवसीय वा टी ट्वेन्टी रिषभ पंतची बॅट अशी काही बोलतीय की त्याच्या बॅटसमोर भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडतीय. IPL 2021 Rishabh pant

IPL 2021 : ज्या गोलंदाजांना धू-धू धुतलं, आता त्यांच्याच बचावासाठी रिषभ पंतला सिक्सर मारावे लागणार!
Rishabh Pant
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 11:39 AM

मुंबई :  कसोटी असो वा एकदिवसीय वा टी ट्वेन्टी रिषभ पंतची (Rishabh Pant) बॅट अशी काही बोलतीय की त्याच्या बॅटसमोर भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडतीय. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रिषभने आपल्या बॅटिंगने आणि विकेट कीपिंगने सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खेचल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना रिषभने धू धू धूतलं. त्यांच्या प्रत्येक बोलर्सविरोधात रिषभने हल्लाबोल केला. मैदानाच्या चारही कोपऱ्यात त्याने षटकार लगावले. आता आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी दिल्लीच्या टीममध्ये असलेल्या इंग्लंडच्या त्याच दोन गोलंदाजांसाठी रिषभला षटकार मारावे लागणार आहे. जास्तीत जास्त धावा करुन आपल्या गोलंदाजांच्या बचावासाठी धावांचा डोंगर उभा करुन टीमला विजय मिळवून देण्यात रिषभला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. (IPL 2021 Rishabh pant Sam Billings And Tom Curran Join Delhi Capital Camp)

सॅम बिलिंग्स आणि टॉम करन दिल्लीच्या टीममध्ये

सॅम बिलिंग्स (Sam Billings) आणि टॉम करन (Tom Curran) आयपीएलच्या दिल्लीच्या टीममधून खेळतात. बिलिंग्जने भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील केवळ एकच सामना खेळला त्यामध्येही तो जखमी झाला. दुसरीकडे टॉम करणने मालिकेतील दोन सामने खेळले. यात त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकही विकेट न घेता 63 धावा आणि दुसर्‍या वनडे सामन्यात 83 धावा देऊन दोन बळी घेतले.

रिषभ पंत दिल्लीचा कर्णधार होऊ शकतो

दिल्ली कॅपिटल्ससाठी मागील आयपीएलचा हंगाम अतिशय चांगला गेला. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पण मुंबईने दिल्लीला पराभवाची धूळ चारुन पाचव्यांदा जेतेपद मिळवलं. मागील काही दिवसांचा फॉर्म पाहता रिषभ पंतला दिल्लीच्या कर्णधारपदी बढती मिळू शकते.

दिल्लीच्या कॅम्पसाठी रिषभ दाखल

9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. दि्ललीचंही सराव शिबीर सुरु झालं असून या शिबीरात रिषभ पंत, सॅम बिलिंग्ज आणि टॉम करर सहभागी झाले आहेत.

आयपीएलचं रण सज्ज

IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(IPL 2021 Rishabh pant Sam Billings And Tom Curran Join Delhi Capital Camp)

हे ही वाचा :

IPL 2021 : गोलंदाजांचे कर्दनकाळ, पांड्या ब्रदर्स आणि सूर्यकुमार यादव मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल, सहाव्यांदा जेतेपद मिळवणार?

IPL 2021 : मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याचा निर्धार, रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल!

IPL 2021 : RCB चे दिग्गज चेन्नईला जमायला सुुरुवात, विराट या दिवशी कॅम्पसाठी रवाना होणार!

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.