AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction: आयपीएल आणि जगातील अन्य टी 20 लीगमध्ये मिळणाऱ्या पैशातील फरक समजून घ्या…

IPL 2022 auction: आयपीएलमध्ये इतका पैसा मिळतो, मग ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, पाकिस्तानच्या PSL लीगमध्ये किती पैसा मिळतो? फरक समजून घ्या....

IPL 2022 Auction: आयपीएल आणि जगातील अन्य टी 20 लीगमध्ये मिळणाऱ्या पैशातील फरक समजून घ्या...
IPL 2022 Auction
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 12:11 PM
Share

बंगळुरु: IPL च्या 15 व्या सीजनसाठी आज आणि उद्या असे दोन दिवस मेगा ऑक्शन (IPL 2022 Auction) रंगणार आहे. एकूण 10 संघ 600 खेळाडूंवर बोली लावतील. जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी भारतासह अन्य देशातील खेळाडूंनी नोंदणी केली आहे. दरवर्षी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. 2008 मध्ये आयपीएल टी 20 (T20 Cricket Leagues) लीगची सुरुवात झाली. त्यावेळी जागतिक क्रिकेटमधील ही एका सर्वात धनाढ्य, श्रीमंत लीग होईल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. प्रत्येक खेळाडूचं आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न असतं. कारण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास जागतिक क्रिकेटमध्ये ओळख मिळतेच, पण त्याचवेळी भरपूर पैसाही मिळतो. आयपीएल इतका पैसा अन्य दुसऱ्या कुठल्याही लीगमध्ये नाही. अन्य देशांच्या क्रिकेट लीगमध्ये किती पैसा मिळतो, जाणून घ्या.

भारतासह क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांमध्येही टी 20 लीग स्पर्धा होतात. ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग, पाकिस्तानात PSL, इंग्लंडमध्ये ब्लास्ट, बांगलादेशात बांगलादेश प्रिमियर लीग, वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग, न्यूझीलंडमध्ये सुपर स्मॅश लीग, त्याशिवाय श्रीलंकेतही टी 20 लीग होते. पण या लीगना आयपीएल इतका ग्लोबल चेहरा नाहीय. आयपीएल नंतर पीएसएल, बीपीएल, सीपीएल लीगची चर्चा होते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली? आयपीएलमध्ये ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडू त्या संघासोबत जोडला जातो. ऑक्शनमध्ये जो संघ जास्त पैसा देतो खेळाडू त्या संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम केएल राहुलला मिळाली आहे. लखनऊ संघाकडून खेळण्यासाठी त्याला 17 कोटी रुपये मिळाले आहेत. आज ऑक्शनमध्ये कुठल्याही खेळाडूला यापेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. आयपीएल ऑक्शनमधला दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरीस सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी पेक्षा जास्त रक्कम मोजून विकत घेतलं होतं.

जगातील अन्य टी 20 लीगमध्ये किती पैसा मिळतो? ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीगमध्ये खेळाडू ड्राफ्टच्या माध्यमातून संघाचा भाग बनतात. तिथे ऑक्शन पद्धत नसते. संघ स्वत: खेळाडू सोबत करार करतात. जवळपास दोन महिने ही लीग चालते. यात सर्वाधिक 1.90 कोटी रुपयापर्यंत रक्कम मिळते. क्रिकेटमधल्या मोठ्या खेळाडूंना इतका पैसा मिळतो.

पाकिस्तान सुपर लीगची मागच्या काही वर्षात ग्रोथ झाली आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात होते. या स्पर्धेत खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंची संख्या वाढली आहे. इथेही ड्राफ्ट सिस्टिम आहे. पीएसएलमध्ये जास्तीत जास्त 1.27 कोटी रुपये मिळतात. बाबर आजम सारख्या मोठ्या खेळाडूला इतका पैसा मिळतो.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.