IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?

आयपीएल 2022 (IPL 2022) चा महालिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व 10 फ्रँचायझींचे डोळे आता बंगळुरुकडे लागले आहेत, जिथे 590 खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. 5 वेळा आयपीएल चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सनेही या महालिलावासाठी तयारी केली आहे.

IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?
Mumbai Indians (फोटो- सोशल मीडिया)
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 4:03 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चा महालिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व 10 फ्रँचायझींचे डोळे आता बंगळुरुकडे लागले आहेत, जिथे 590 खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. 5 वेळा आयपीएल चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सनेही या महालिलावासाठी तयारी केली आहे. एका अंदाजानुसार मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ 5 स्टार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी आग्रही असेल. कारण ते खेळाडू त्यांच्या संघासाठी परफेक्ट असतील. आपल्या संघाला पूर्वीप्रमाणे मजबूत संघ म्हणून मैदानात उतरवण्यासाठी मुंबई इंडियन्सचे संघमालक जुन्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतील.

मुंबई इंडियन्सचे संघमालक कोणकोणत्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी प्रयत्नशील असतील, हे जाणून घेण्याआधी समजून घ्या मुंबई इंडियन्सच्या संघमालकांच्या पर्समध्ये किती पैसे आहेत? त्यांनी कोणकोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे? रिटेन केलेल्या खेळाडूंवर किती पैसे खर्च झाले आहेत? मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माला 16 कोटी रुपये, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला 12 कोटी रुपये, मधल्या फळीतला फलंदाज सूर्यकुमार यादवला 8 कोटी रुपये आणि स्फोटक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला 6 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले आहे. या चार खेळाडूंवर 42 कोटी रुपये खर्च केल्यानंतर फ्रँचायझीच्या पर्समध्ये 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.

या 5 खेळाडूंवर MI बोली लावणार

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) : आयपीएल 2022 च्या लिलावात, मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या खेळाडूवर लक्ष केंद्रित करेल. त्याचा अलीकडचा फॉर्म आणि विकेट घेण्याची क्षमता हे त्यामागचे कारण असेल. लेगस्पिनर युजवेंद्र चहल गेल्या मोसमात आरसीबीचा भाग होता. पण, त्याआधी तो मुंबई संघासोबत आयपीएलही खेळला आहे. यावेळी चहलला संघात घेऊन मुंबई इंडियन्सला आपल्या फिरकीची ताकद वाढवायची आहे.

क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) : दक्षिण आफ्रिकेचा हा यष्टिरक्षक फलंदाज गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सचा भाग होता. पण यावेळी फ्रँचायझीने त्याला 4 खेळाडूंमध्ये कायम ठेवले नाही. आता त्याला रिटेन केलं नाही याचा अर्थ असा नाही की, संघमालक त्याला पुन्हा विकत घेणार नाहीत. ओपनिंग आणि विकेटकीपिंगचा प्रश्न एकाच खर्चात सोडवण्यासाठी मुंबई इंडियन्स डी कॉकसाठी पर्समधील भरपूर पैसे खर्च करेल.

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) : हा न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाजही गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. परंतु मुंबईला डीकॉकप्रमाणे बोल्टला रिटेन करता आलं नाही. मात्र मुंबई इंडियन्स त्याला महा लिलावाद्वारे पुन्हा एकदा संघात घेण्यास इच्छूक असेल. कारण बुमराह आणि बोल्ट या जोडीने पूर्वीप्रमाणेच प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत राहावे अशी त्यांची इच्छा आहे. डेथ ओव्हर्समध्ये कंजूष गोलंदाजी करणे, पॉवरप्लेमध्ये विकेट घेणे आणि स्विंगसह फलंदाजांना अडचणीत आणणे ही बोल्टची सर्वात मोठी ताकद आहे.

इशान किशन (Ishan Kishan): मुंबईला डीकॉक आणि बोल्टप्रमाणे इशान किशनलादेखील रिटेन करता आले नाही. मात्र संघमालक महालिलावात त्याच्या नावावर बोली लावू शकतात. त्याला संघात घेतलं तर मुंबईचा विकेटकीपिंग आणि ओपनिंगचा प्रश्न सुटेल. तसेच, किशन मधल्या फळीतही फलंदाजी करण्यास सक्षम आहे.

आवेश खान (Avesh Khan) : दिल्ली कॅपिटल्सने अवेश खानला आयपीएल 2022 साठी संघात कायम ठेवले नाही. तो दिल्लीच्या संघातील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. परंतु त्यांनादेखील मुंबईप्रमाणे आपले सर्वच चांगले खेळाडू रिटेन करता आले नाहीत. यावेळी दिल्लीचे संघमालक त्याला संघात पुन्हा घेण्यासाठी प्रयत्न करतील. सोबतच मुंबई इंडियन्सचीदेखील त्याच्यावर नजर असेल. मुंबईला एक चांगला भारतीय जलदगती गोलंदाज हवा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आवेश खान किंवा चेतन साकरियाला संघात घेण्यासाठी प्रयत्न करेल.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.