Ramesh Kumar IPL 2022 Auction: टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 चेंडूत अर्थशतक, धडाकेबाज फलंदाज KKR च्या ताफ्यात

आयपीएल 2022 ऑक्शनच्या (IPL 2022 Auction) दुसऱ्या दिवशी कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रमेश कुमार (Ramesh Kumar) नावाचा एक खेळाडू खरेदी केला. या खरेदीनंतर केकेआरच्या टेबलवर सर्वजण आनंदाने एकमेकांचं अभिनंदन करत होते.

Ramesh Kumar IPL 2022 Auction: टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 चेंडूत अर्थशतक, धडाकेबाज फलंदाज KKR च्या ताफ्यात
Aryan Khan - Janhvi Mehta - KKR
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 11:51 AM

मुंबई : आयपीएल 2022 ऑक्शनच्या (IPL 2022 Auction) दुसऱ्या दिवशी कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रमेश कुमार (Ramesh Kumar) नावाचा एक खेळाडू खरेदी केला. या खरेदीनंतर केकेआरच्या टेबलवर सर्वजण आनंदाने एकमेकांचं अभिनंदन करत होते. तर दुसऱ्या बाजूला इतर संघांचे लोक केकेआरच्या टेबलकडे आश्चर्याने पाहात होते. सर्वांना आश्चर्य वाटत होतं की, कोण आहे हा खेळाडू आणि त्यासाठी केकेआर संघव्यवस्थापन इतकं खुश का झालं आहे. विशेष म्हणजे केकेआरने हा खेळाडू अवघ्या 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला होता. रमेश कुमारचं नाव लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात पुकारण्यात आलं होतं. परंतु रमेश कुमारबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कारण हा खेळाडू अद्याप प्रोफेशनल लेव्हलवर खेळला नाही. अशातच केकेआरने या खेळाडूसाठी बोली लावणं हा इतरांना धक्का होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कुमार हा पंजाबचा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे एक मोठे नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेट सर्किटमध्ये रमेश कुमार नारायण जलालाबादिया (Narine Jalalabadiya) या नावाने प्रसिद्ध आहे. लिलावापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्सला ट्रायलही दिली होती. तो डाव्या हाताने फलंदाजी करतो. रमेश कुमार उत्तुंग षटकार लगावण्यासाठी ओळखला जातो. तो गोलंदाजीही करतो पण गोलंदाजीपेक्षा त्याला त्याच्या फलंदाजीमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. केकेआरने त्याच्यावर केवळ त्याच्या फलंदाजीमुळे पैसे गुंतवल्याचे मानले जात आहे.

शाहरुख खानच्या मालकीच्या संघाने त्यांचा शेवटचा खेळाडू म्हणून रमेश कुमारला संघात घेतले. रमेश कुमारचे युट्यूबवर Narine Jalalabadiya नावाने अनेक व्हिडिओ आहेत. यामध्ये तो मोठे फटके लगावताना दिसत आहे. आता रमेश कुमारला आयपीएल 2022 मध्ये केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहावे लागेल.

Auction नंतरचा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ

व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्ज, अनुकुल रॉय, रसिक सलाम, अभिजित तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊथी, अॅलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चामिका करुणारत्ने.

इतर बातम्या

IPL 2022 : IPL मध्ये त्याला कोणी विचारलं नाही, अखेर ‘त्या’ सौंदर्यवतीने समोर येऊन दिलं उत्तर, कोण आहे ‘ती’

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर

IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.