IPL 2022 RCB Vs PBKS: दिनेश कार्तिकचा धुमाकूळ, 14 चेंडूत ठोकल्या 32 धावा, डुप्लेसीचं शतक हुकलं

IPL 2022 RCB Vs PBKS: दिनेश कार्तिकचा धुमाकूळ, 14 चेंडूत ठोकल्या 32 धावा, डुप्लेसीचं शतक हुकलं
Dinesh Karthik
Image Credit source: Twitter / Dinesh Karthik

इंडियन प्रीमियर लीगमधला तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळवण्यात आला. बँगलोरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या.

अक्षय चोरगे

|

Mar 28, 2022 | 9:59 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधला तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळवण्यात आला. बँगलोरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी एक अवघड लक्ष्य ठेवलं होतं. पण पंजाबने आरामात हे टार्गेट पार केलं. पंजाब किंग्सला हे जमणार नाही, असं वाटतं होतं. त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली होती. पण मधल्या षटकात त्यांच्या विकेट गेल्या. त्यामुळे पंजाब किंग्स लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही, असं वाटत होतं. पण T-20 क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्याचा प्रत्यय रविवारी आला. शाहरुख खान आणि ओडीन स्मिथच्या (Odean smith) जोडीने पंजाब किंग्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबला हा सामना जिंकता आला तो, स्मिथच्या फटकेबाजीमुळे. त्याने मोहम्मद सिराजच्या एकाच षटकात 25 धावा चोपल्या. त्यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघानेदेखील तुफानी आतषबाजी करत 205 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार फाफ डुप्लेसी (88), विराट कोहली (41) आणि दिनेश कार्तिक (32) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 206 धावांचे डोंगराऐवढे वाटणारे लक्ष्य ठेवले होते.

कार्तिकचं वादळ

अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी आला आणि त्याने अवघ्या 14 चेंडूत 32 धावा ठोकल्या. कार्तिकने आपल्या छोट्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. दिनेश कार्तिकने आपल्या डावात 228 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराट कोहलीसह दिनेश कार्तिकने 17 चेंडूत 37 धावांची भागीदारी केली.

डुप्लेसीचं शतक हुकलं

कर्णधार फाफ डू प्लेसीसबद्दल बोलायचे झाले तर त्याने 57 चेंडूत 88 धावा चोपल्या. आपल्या खेळीत फॅफने 3 चौकार, 7 षटकार लगावले. विशेष म्हणजे सुरुवातील फाफने जास्त चेंडू खेळले होते आणि धावा खूप कमी होत्या. पण नंतर त्याने आपला गियर अशा प्रकारे बदलला की त्याने प्रत्येक चेंडू सीमारेषेजवळ टोलवला. डुप्लेसी बाद झाला तेव्हा तीन षटकांचा खेळ बाकी होता आणि त्याला शतकासाठी 12 धावांची आवश्यकता होती. तो अगदी सहज शतक पूर्ण करु शकला असता, परंतु अर्शदीप सिंहने त्याला शाहरुख खानकरवी झेलबाद केलं.

ओडीन स्मिथने बँगलोरच्या तोंडचा घास हिरावला

दरम्यान, बँगलोरने 206 धावांचं लक्ष्य दिल्यानंतर ओडीन स्मिथने अशक्यप्राय वाटणारा विजय सहज साध्य करुन दाखवला. पंजाबकडून कॅप्टन मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 71 धावांची भागीदारी केली. मयंक 32 आणि शिखर 43 धावांवर आऊट झाला. राजपक्षेनेही 43 धावांची खेळी केली. त्यानंतर फटकेबाजी करणारा लियम लिविंगस्टन आऊट झाला. आकाश दीपच्या गोलंदाजीवर अनुज रावतने सीमा रेषेनजीक सुंदर झेल घेतला. लिविंगस्टनने 19 धावा केल्या. यात दोन षटकार होते.

पंजाब किंग्सच्या 15 षटकात पाच बाद 156 धावा झाल्या होत्या. त्यानंतर शाहरुख खान आणि ओडीन स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. शाहरुखने 20 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते. स्मिथ-शाहरुख जोडीने RCB च्या गोलंदाजांची लय बिघडवून टाकली.

इतर बातम्या

Mumbai Indians च्या Murugan Ashwin ने टिम सायफर्टची दांडी उडवली तो अप्रतिम गुगली चेंडू एकदा पहाच VIDEO

IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?

Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें