PBKS विरुद्ध RCB, IPL 2022: ओडियन स्मिथने सामना फिरवला, पंजाबला मिळवून दिला अशक्य वाटणारा विजय

IPL 2022 च्या सीजनमध्ये आज डबल हेडरचा दिवस आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (PBKS vs RCB) आज दुसरा सामना होत आहे.

PBKS विरुद्ध RCB, IPL 2022: ओडियन स्मिथने सामना फिरवला, पंजाबला मिळवून दिला अशक्य वाटणारा विजय

|

Mar 27, 2022 | 11:41 PM

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी एक अवघड लक्ष्य ठेवलं होतं. पण किंग्स इलेव्हन पंजाबने (KXIP) आरामात हे टार्गेट पार केला. पंजाब किंग्सला हे जमणार नाही, असं वाटतं होतं. त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली होती. पण मधल्या षटकात त्यांच्या विकेट गेल्या. त्यामुळे पंजाब किंग्स लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही, असं वाटत होतं. पण T 20 क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्याचा प्रत्यय आज आला. शाहरुख खान आणि ओडियन स्मिथच्या (Odean smith) जोडीने पंजाब किंग्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबला हा सामना जिंकता आला तो, स्मिथच्या फटकेबाजीमुळे. त्याने मोहम्मद सिराजच्या एकाच षटकात 25 धावा चोपल्या. तीन षटकार आणि एक चौकाराचा समावेश त्यामध्ये होता.

स्मिथने अशक्यप्राय वाटणारा विजय सहज साध्य करुन दाखवला. पंजाबकडून कॅप्टन मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 71 धावांची भागीदारी केली. मयंक 32 आणि शिखर 43 धावांवर आऊट झाला. राजपक्षेनेही 43 धावांची खेळी केली. त्यानंतर फटकेबाजी करणारा लियम लिविंगस्टन आऊट झाला. आकाश दीपच्या गोलंदाजीवर अनुज रावतने सीमा रेषेनजीक सुंदर झेल घेतला. लिविंगस्टनने 19 धावा केल्या. यात दोन षटकार होते.

पंजाब किंग्सच्या 15 षटकात पाच बाद 156 धावा झाल्या होत्या. त्यानंतर शाहरुख खान आणि ओडियन स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. शाहरुखने 20 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते. स्मिथ-शाहरुख जोडीने RCB च्या गोलंदाजांची लय बिघडवून टाकली. त्याआधी फाफ डुप्लेसी (88), विराट कोहली (41) आणि दिनेश कार्तिक (32) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 206 धावांचे डोंगराऐवढे वाटणारे लक्ष्य ठेवले होते.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 27 Mar 2022 11:21 PM (IST)

  ओडियन स्मिथने सामना फिरवला

  RCB ने दिलेलं 206 धावांचं लक्ष्य पंजाब किंग्सने आरामात पार केलं. पंजाबने आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे. ओडियन स्मिथने सामना फिरवला. त्याने आठ चेंडूत नाबाद 25 धावा फटकावल्या. यात एक चौकार आणि तीन षटकार होते.

 • 27 Mar 2022 11:15 PM (IST)

  ओडीयन स्मिथने सामना पंजाबच्या बाजूने झुकवला

  ओडीयन स्मिथने मोहम्मद सिराजची गोलंदाजी फोडून काढली. सिराजच्या षटकात स्मिथने 25 धावा चोपून काढल्या. पंजाबला विजयासाठी 12 चेंडूत 11 धावांची आवश्यक आहेत.

 • 27 Mar 2022 10:58 PM (IST)

  दे दणादण फलंदाजी करणारा लिविंगस्टन OUT

  फटकेबाजी करणारा लियम लिविंगस्टन आऊट झाला आहे. आकाश दीपच्या गोलंदाजीवर अनुज रावतने सीमा रेषेनजीक सुंदर झेल घेतला. लिविंगस्टनने 19 धावा केल्या. यात दोन षटकार होते. पंजाब किंग्सच्या 15 षटकात पाच बाद 156 धावा झाल्या आहेत.

 • 27 Mar 2022 10:45 PM (IST)

  सिराजने लागोपाठच्या दोन चेंडूंवर काढले विकेट

  मोहम्मद सिराजने लागोपाठच्या दोन चेंडूंवर राजपक्षा (43) आणि राज बावाला (०) बाद करुन पंजाब किंग्सला अडचणीत आणलं आहे. पंजाबच्या चार बाद 141 धावा झाल्या आहेत.

 • 27 Mar 2022 10:11 PM (IST)

  आठ षटकात पंजाबच्या एक बाद 75 धावा

  आठ षटकात पंजाबच्या एक बाद 75 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 32 धावांवर आऊट झाला. शिखर धवन 30 धावांवर खेळतोय.

 • 27 Mar 2022 09:53 PM (IST)

  मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचीही धमाकेदार सुरुवात

  RCB ने दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सनेही धमाकेदार सुरुवात केली आहे. पाच षटकात त्यांच्या बिनबाद 57 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 18 आणि कॅप्टन मयंक अग्रवाल 30 धावांवर खेळतोय.

 • 27 Mar 2022 09:13 PM (IST)

  पंजाब किंग्सला विजयासाठी दिले डोंगराऐवढे लक्ष्य

  फाफ डुप्लेसी (88), विराट कोहली (41) आणि दिनेश कार्तिकने (32) अखेरच्या षटकात केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 206 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे.

 • 27 Mar 2022 08:56 PM (IST)

  फाफ डुप्लेसी आऊट

  RCB साठी फाफ डुप्लेसी आज कॅप्टन इनिग्स खेळला. 57 चेंडूत त्याने 88 धावा केल्या. यात तीन चौकार आणि सात षटकार होते. अर्शदीपसिंहच्या गोलंदाजीवर शाहरुख खानने त्याचा झेल घेतला.

 • 27 Mar 2022 08:49 PM (IST)

  आरसीबीच्या 150 धावा

  आरसीबीच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. कॅप्टन फाफ डुप्लेसिस जबरदस्त फलंदाजी करतोय. त्याने नाबाद 75 धावा केल्या आहेत. विराट कोहली 33 धावांवर खेळतोय.

 • 27 Mar 2022 08:16 PM (IST)

  विराट कोहली मैदानात

  आता विराट कोहली आणि डुप्लेसीची जोडी मैदानात आहे. RCB च्या एक बाद 67 धावा झाल्या आहेत.

 • 27 Mar 2022 08:15 PM (IST)

  RCB चा पहिला विकेट

  RCB ने आपला पहिला विकेट गमावला आहे. सलामीवीर अनुज रावत सातव्या षटकात राहुल चाहरच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याने 21 धावा केल्या.

 • 27 Mar 2022 08:14 PM (IST)

  असा आहे RCB चा संघ

  रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून डेविड विली आणि आकाश दीप ipl मध्ये डेब्यू करत आहेत. RCB: फाफ डुप्लेसी (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिन्दु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप

 • 27 Mar 2022 08:11 PM (IST)

  असा आहे पंजाबचा संघ

  पंजाब किंग्सचा कॅप्टन मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. PBKS: मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियम लिविंगस्टन, भानुका राजपाक्षा (विकेटकीपर), ओडीन स्मिथ, शाहरुख खान, राजअंगद बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, संदीप शर्मा आणि राहुल चाहर

Published On - Mar 27,2022 8:08 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें