…म्हणून एबी डिव्हिलियर्स यंदा IPL खेळणार नाही, दिनेश कार्तिकने सांगितलं कारण

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. संघाने कर्णधार बदलला, अनेक नवीन खेळाडू संघात आले आहेत. स्पर्धेच्या 15 व्या हंगामात आयपीएल जिंकण्याचे आरसीबीचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आरसीबीच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

...म्हणून एबी डिव्हिलियर्स यंदा IPL खेळणार नाही, दिनेश कार्तिकने सांगितलं कारण
Dinesh Karthik Image Credit source: TWITTER
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:27 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. संघाने कर्णधार बदलला, अनेक नवीन खेळाडू संघात आले आहेत. स्पर्धेच्या 15 व्या हंगामात आयपीएल जिंकण्याचे आरसीबीचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आरसीबीच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. आरसीबीने फॅफ डू प्लेसिसची (Faf du Plessis) कर्णधारपदी नियुक्ती केली असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ उत्तम कामगिरी करण्यास तयार असल्याचे विराट कोहलीने (Virat Kohli) म्हटले आहे. मात्र, आरसीबीला एबी डिव्हिलियर्सची उणीव भासणार आहे. एबी डिव्हिलियर्सने स्पर्धात्मक क्रिकेटला अलविदा केला आहे. दरम्यान, आरसीबीमध्ये दाखल झालेल्या दिनेश कार्तिकने एबीच्या अनुपस्थितीबाबत वक्तव्य केलं आहे.

एबी डिव्हिलियर्सचे आयपीएल न खेळण्याचे कारण दिनेश कार्तिकने दिले. दिनेश कार्तिकने आरसीबीच्या एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, एबी डिव्हिलियर्स आयपीएल खेळत नाही कारण तो खूप चांगला खेळतो. आरसीबीच्या व्हिडीओमध्ये दिनेश कार्तिकने गंमतीने असे म्हटले आहे.

आरसीबीला डिव्हिलियर्सची उणीव भासेल

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या आयपीएल कारकीर्दीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. या फलंदाजाने 184 सामन्यात 39.7 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151.7 होता. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आता ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांना आरसीबीच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

आरसीबीकडे सर्वोत्तम फलंदाजांची फौज

IPL 2022 बद्दल बोलायचे झाले तर RCB चे बॅटिंग युनिट नेहमीप्रमाणे खूप मजबूत दिसत आहे. डू प्लेसिस, मॅक्सवेल, विराट कोहली, दिनेश कार्तिक असे एकापेक्षा एक उत्तम फलंदाज संघात दिसत आहेत. याशिवाय अनुज रावत, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, वानेंदू हसरंगा हे खेळाडूही या संघात सहभागी झाले आहेत. गोलंदाजीत जेसन बेहरेनडॉर्फ, जोश हेझलवूड यांची भर पडल्याने आरसीबीची ताकद वाढली आहे. याशिवाय मोहम्मद सिराज, हर्षल पटेल हे आधीच या संघाचा भाग आहेत. 27 मार्च रोजी RCB पंजाब किंग्ज विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

इतर बातम्या

IPL 2022 मध्ये कॉमेंटेटर्स होणार मालामाल, हर्षा भोगले ते सुनील गावस्कर जाणून घ्या दिग्गजांची ‘फी’

IPL 2022 ला चार दिवस उरलेले असताना Delhi Capitals साठी मोठी गुड न्यूज, हुकूमी एक्का 7 एप्रिलला करणार कमबॅक

Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.