AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: हार्दिक पांड्या अहमदाबादचा कॅप्टन – रिपोर्ट्स

इशान किशन आणि अफगाणिस्तानचा राशिद खान हे दोन खेळाडू अहमदाबाद संघाकडून खेळू शकतात. सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबाद संघाचे हक्क विकत घेतले आहेत.

IPL 2022: हार्दिक पांड्या अहमदाबादचा कॅप्टन - रिपोर्ट्स
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 5:53 PM
Share

मुंबई: आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या (Hardik pandya) आपल्याला कर्णधाराच्या भूमिकेत दिसू शकतो. अहमदाबाद फ्रेंचायजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवू शकते. इशान किशन आणि अफगाणिस्तानचा राशिद खान हे दोन खेळाडू अहमदाबाद संघाकडून खेळू शकतात. सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबाद संघाचे हक्क विकत घेतले आहेत. काही बेटिंग कंपन्यांबरोबर सीव्हीसीची लिंक समोर आल्यामुळे बीसीसीआय सावध पावलं उचलत होती. पण आता त्यांनी अहमदाबाद संघाला मान्यता दिली आहे. ‘द फ्रि प्रेस’ने हे वृत्त दिलं आहे. (IPL 2022 Hardik Pandya likely to captain Ahmedabad based team)  

आधी श्रेयस अय्यरला कर्णधार बनवणार अशी चर्चा होती. पण आता ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हार्दिक बरोबर राशिद खानही अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतो.

हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन नाही केलं हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नव्हते. पांड्या पाठिच्या दुखण्यामुळे पहिल्यासारखी गोलंदाजी करु शकत नाहीय व त्याची फलंदाजी सुद्धा चांगली होत नाहीय. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद फ्रेंचायजीने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतलाय. हार्दिककडे 92 आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे. त्याने 1476 धावा केल्या आहेत. पांड्याची सरासरी 27.33 आहे. आयपीएलच्या बेस्ट फिनिशर्समध्ये हार्दिकची गणना होते. त्याशिवाय त्याने 42 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या एक उत्तम क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.

अहमदाबादला मिळणार राशिद खान आयपीएलमधील उत्तम लेगस्पिनर्समध्ये राशिद खानची गणना होते. तो मॅचविनरही आहे. राशिद खानची अहमदाबाद फ्रेंचायजी बरोबर बोलणी झाली आहेत तो ड्राफ्ट प्लेयरचा भाग असेल, असे वृत्त आहे. राशिद खानने सनरायजर्स हैदराबादला रीटेन करण्यासाठी नकार दिला होता. त्याने 76 मॅचमध्ये 93 विकेट घेतल्या आहेत. प्रतिषटक इकोनॉमी रेट 6.33 आहे.

संबंधित बातम्या:

IND vs SA 3rd Test Cape Town Weather: केपटाऊनमध्येही पाऊस खलनायक बनणार? जाणून घ्या वेदर रिपोर्ट Virat Kohli: दोन चुकांमध्ये किती अंतर पाहिजे, करीयर कसं पुढे जातं? विराटने सांगितली धोनीची शिकवण Rishabh Pant: ‘खेळाडू मोठा असो वा छोटा, चूक ही चूकच असते’, ऋषभ पंतला पुन्हा सुनावलं

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.