AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul LSG vs SRH: राहुलची कॅप्टन इनिंग, लखनौची नौका किनाऱ्यावर लावली, मागच्या दोन सामन्यांची भरुन काढली कसर

KL Rahul LSG vs SRH: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन बनवलं. याचं मुख्य कारण होतं त्याची फलंदाजी.

KL Rahul LSG vs SRH: राहुलची कॅप्टन इनिंग, लखनौची नौका किनाऱ्यावर लावली, मागच्या दोन सामन्यांची भरुन काढली कसर
IPL 2022: लखनौै सुपर जायंट्स कॅप्टन के.एल.राहुल Image Credit source: IPL
| Updated on: Apr 04, 2022 | 10:15 PM
Share

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन बनवलं. याचं मुख्य कारण होतं त्याची फलंदाजी. मागच्या काही आयपीएल सीजन्समध्ये धावांच्या डोंगर उभा करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुलचा समावेश होतो. आयपीएल 2022 च्या पहिल्या सीजनमध्ये राहुल विशेष काही करु शकला नव्हता. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर राहुलला पॅव्हेलियनमध्ये धाडलं होतं. केएल राहुलला पहिल्या सामन्यात खात सुद्धा उघडता आलं नव्हतं. दुसऱ्या सामन्यात 40 धावा करुन त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राहुलची अर्धशतकाची संधी हुकली. पण आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध केएल राहुलने ती कसर भरुन काढली. राहुलने आज कॅप्टन इनिंग्स खेळत शानदार अर्धशतक झळकावलं. संघाच्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या. राहुल ज्या कुठल्या संघाकडून खेळतो, त्या टीमच्या प्रमुख फलंदाजामध्ये त्याचा समावेश होतो.

असा सावरला डाव

राहुलला आज कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवावा लागणार होता. कारण लखनौच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच टीमच्या तीन विकेट गेल्या होत्या. दुसरा सलामीवीर क्विंटन डि कॉकला वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. चौथ्या ओव्हरमध्ये सुंदरने इविन लुईसची मोठी विकेट काढली. लुईस बाद झाला त्यावेळी लखनौच्या दोन बाद 16 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मनीष पांडे सुद्धा तंबूत परतला. संघाची धावसंख्या तीन बाद 27 होती. केएल राहुल आणि दीपक हुड्डाने चौथ्या विकेटसाठी शानदार भागीदारी करुन टीमला संकटातून बाहेर काढलं. त्यांनी 87 धावांची भागीदारी केली. राहुलने 40 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे त्याचं 28 वं अर्धशतक आहे.

हाफ सेंच्युरीनंतर आक्रमक फलंदाजी

अर्धशतक पूर्ण होताच राहुलने आक्रमक फलंदाजी सुरु केली. वॉशिंग्टन सुंदरच्या 17 व्या षटकात त्याने पहिल्या दोन चेंडूंवर चौकार आणि त्यानंतर षटकार मारला. 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर जीवदानही मिळालं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अब्दुल समदने त्याचा झेल सोडला. टी.नटराजन टाकत असलेल्या 19 व्या षटकात केएल राहुल पायचीत झाला. राहुलने रिव्ह्यू घेतला. पण त्याचा फायदा झाला नाही. त्याने 50 चेंडूत 68 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता.

Follow Us
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?