AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 मध्ये आला नवीन मिस्ट्री बॉलर, Mumbai Indians चा ‘लकी चार्म’, अन्य टीम्सनी आताच सावध व्हा

IPL 2022: या सीजनमध्ये मुंबईकडे एकही फ्रंटलाइन स्पिन्र नाहीय. राहुल चाहर मागच्या सीजनपर्यंत मुंबई इंडियन्सकडे होता. पण या सीजनमध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळतोय.

IPL 2022 मध्ये आला नवीन मिस्ट्री बॉलर, Mumbai Indians चा 'लकी चार्म', अन्य टीम्सनी आताच सावध व्हा
मुंबई इंडियन्स टीम Image Credit source: IPL
| Updated on: May 01, 2022 | 2:58 PM
Share

मुंबई: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) ज्या प्रदर्शनाची अपेक्षा केली जात होती, तशी कामगिरी हा संघ करु शकलेला नाही. सलग आठ पराभवानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने विजयाचं खात उघडलं. या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर थोडी चांगली कामगिरी झाली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सहा विकेट गमावून 158 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. या सामन्यादरम्यान मुंबईच्या दोन गोलंदाजांनी प्रभावित केलं. यात एक ऑफस्पिन्र ऋतिक शौकीन आणि दुसरा कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya) आहे. हे दोघांनी मुंबईच्या स्पिन गोलंदाजीची धुरा वाहण्याची अपेक्षा निर्माण केली आहे.

ज्या दोघांना संधी दिली, त्यांनी निराश केलं

या सीजनमध्ये मुंबईकडे एकही फ्रंटलाइन स्पिन्र नाहीय. राहुल चाहर मागच्या सीजनपर्यंत मुंबई इंडियन्सकडे होता. पण या सीजनमध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळतोय. कृणाल पंड्या आता लखनौकडून खळतो. मुंबईने मुरुगन अश्विन आणि मयांक मार्केंडे दोघांना संधी दिली. पण दोघेही प्रभावित करु शकले नाहीत.

त्याने राजस्थानच्या फलंदाजांना जखडून ठेवलं

कार्तिकेयने शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेब्यु केला. हा फिरकी गोलंदाज मध्य प्रदेशकडून आतापर्यंत आठ सामने खेळला आहे. आपल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या चेंडूवर विकेट घेण्यात कार्तिकेय यशस्वी ठरला. तो आठव षटक टाकत होता. त्याने राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला बाद केलं. त्यानंतर कार्तिकेय विकेट मिळवू शकला नाही. पण त्याने राजस्थानच्या फलंदाजांना सहजासहजी धावही करु दिल्या नाहीत. आपल्या कोट्यातील चार षटकात 19 धावा देत त्याने एक विकेट घेतला.

व्हेरिएशन्समुळे तो मिस्ट्री गोलंदाज

कार्तिकेयच्या गोलंदाजीमुळे मुंबईला दिलासा मिळाला. पारंपारिक चायनामन गोलंदाजीशिवाय कार्तिकेयकडे व्हेरिएशन आहे. तो चेंडूला चांगला फ्लाइट देतो. लेग स्पिन, गुगली शिवाय सरळ चेंडू सुद्धा टाकतो. व्हेरिएशन्समुळे तो मिस्ट्री गोलंदाज ठरला आहे.

मिचेल आणि बटलरला त्याची गोलंदाजी खेळणं कठीण गेलं

गोलंदाजीतील वैविध्य समजून घेणं, फलंदाजाला कठीण जातं. गोलंदाजीशिवाय कार्तिकेयच्या आणखी एका गोष्टीने प्रभावित केलय, तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास. “तो काय गोलंदाजी करतोय, हे समजून घेण्यासाठी सात चेंडू खेळावे लागले. डावखुरी गोलंदाजी करताना, तो स्पिन, सीम बॉलिंग, कॅरम बॉल असे सगळ्याच प्रकारचे चेंडू टाकतो. फलंदाज तो खराब चेंडू कधी टाकतोय, त्याची वाट पहात होते. मिचेल आणि बटलरला त्याची गोलंदाजी खेळणं कठीण गेलं” असं न्यूझीलंडचे महान फिरकी गोलंदाज डॅनियल विटोरी म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.