IPL 2022 Orange Cap : शुभमन गिलची आगेकूच! वॉर्नर TOP 5 मधून बाहेर, तुमचा आवडता खेळाडू कुठेय?

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय, पाहुया...

IPL 2022 Orange Cap : शुभमन गिलची आगेकूच! वॉर्नर TOP 5 मधून बाहेर, तुमचा आवडता खेळाडू कुठेय?
शुभमन गिलची ऑरेंज कॅपमध्ये आगेकूचImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 8:41 AM

मुंबई : कमी धावसंख्या असूनही गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) गोलंदाजांनी काल जबरदस्त कामगिरी केली. एकप्रकारे ही त्यांची परीक्षाच होती. त्यात ते पास झाले. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) तब्बल 62 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातचे 18 गुण झाले आहेत. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातने लखनौला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते. पण केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौचा डाव 82 धावात आटोपला. राशिद खान काल आपल्या नावाला जागला. त्याच्या लेग ब्रेक गोलंदाजीने कमाल केली. चार ओव्हर्समध्ये 24 धावा देत त्याने चार विकेट घेतल्या. राशिद खानने ऑलराऊंडर दीपक हुड्डाला (27), कृणाल पंड्या (5), जेसन होल्डर (1) आणि आवशे खान (12) या विकेट काढल्या. कृणाल पंड्याचा विकेट तर अप्रतिम होता. राशिद खानने आज अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने कृणाला पंड्याला अप्रतिम गुगलीवर खेळण्यासाठी क्रीझ बाहेर आणलं. कृणालची पावलं क्रीझ बाहेर जाताच विकेटकीपर सहाने कुठलीही चूक केली नाही. त्याने लगेच स्टम्पिंग केलं. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने या सीजनमध्ये आतापर्यंत 618 धावा काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 459 धावा काढल्या आहेत.त्यानंतर तिसऱ्या फाफ डु प्लेसिस असून त्याने 389 धावा काढल्या आहेत. चौथ्या स्थानी शिखर धवन धवनला धक्का देत शुभमन गिल आलाय. याने आतापर्यंत 384 धावा काढल्या आहेत. तर शिखरने 381 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या असून तो पाचव्या स्थानी गेलाय. डेव्हिड वॉर्नर मात्र टॉप फाईव्ह बाहेर गेलाय.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

शुभमन गिलचं अर्धशतक

गुजरात टायटन्सच्या संघाला लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी 144 धावांवर रोखलं. गुजरातचे फक्त चार विकेट गेले. शुमभन गिलचं अर्धशतक आणि राहुल तेवतियाने अखेरीस केलेल्या फलंदाजीच्या बळावर गुजरातला 144 पर्यंत पोहोचता आला. सलामीवीर शुभमन गिलने 49 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. यात सात चौकार होते. तेवतियाने 16 चेंडूत चार चौकारांसह 22 धावा केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी सुपर कामगिरी केली. खासकरुन आवेश आणि मोहसीन खानने भेदक मारा केला. आवेश खानने मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्या हे दोन महत्त्वाचे विकेटस मिळवले. डेविड मिलरने 24 चेंडूत 26 धावा केल्या. यात फक्त एक चौकार आणि एक षटकार होता.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.