IPL 2022: मयंकच्या कॅप्टनशिपवर पंजाब किंग्सला विश्वास नाही का? हरभजन सिंग भडकला

IPL 2022: मयंकच्या कॅप्टनशिपवर पंजाब किंग्सला विश्वास नाही का? हरभजन सिंग भडकला

कॉम्प्युटरला खेळ समजत असेल, तर मैदानावर कॅप्टनची गरज काय? असा सवाल हरभजनने ऑन एयर कॉमेंट्री करताना केला. तुम्ही बाहेर बसून कॅप्टनला मार्गदर्शन करु शकत नाही, असं हरभजन म्हणाला.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 14, 2022 | 5:27 PM

मुंबई: पंजाब किंग्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (PBKS vs RCB) हरवलं. या विजयामुळे पंजाबच्या प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या आशा कायम आहेत. पंजाबने या सामन्यात बँगलोरवर एकतर्फी विजय मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात पंजाबने बँगलोरपेक्षा सरस कामगिरी केली. पंजाबच्या या कामगिरीने त्या टीमचे फॅन्स खूश झाले. पण टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan singh) मात्र नाराज झाला. हरभजनचा राग पंजाबच्या कोचिंग स्टाफवर होता. सामन्यादरम्यान पंजाबचा कोचिंग स्टाफ (Punjab coaching Staff) बँगोलरच्या खेळाडूंविरोधात कॉम्प्युटरवर रणनिती आखत होता. डगआउट एरियामधून कॅप्टन मयंक अग्रवालला काही इशारे करण्यात आले. हरभजन सिंगला ही गोष्ट पटली नाही. त्याने कॉमेंट्री करतानाच या प्रकरावर टीका केली.

कॉम्प्युटरला खेळ समजत असेल, तर मैदानावर कॅप्टनची गरज काय? असा सवाल हरभजनने ऑन एयर कॉमेंट्री करताना केला. तुम्ही बाहेर बसून कॅप्टनला मार्गदर्शन करु शकत नाही, असं हरभजन म्हणाला.

धोनी आणि रोहित कधीच असं करत नाहीत

हरभजनने आयपीएलमधील दोन सर्वश्रेष्ठ कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माच उदहारण दिलं. “मी कधी धोनी आणि रोहितला मॅचअपवर काम करताना बघितलं नाही. ते जन्मापासूनच कॉम्प्युटर आहेत. क्रिकेट खेळण्याची ही योग्य पद्धत नव्हे. कॉम्प्युटरवर आकडे बघणं योग्य नाही” असं हरभजन सिंगने सांगितलं. मयंक अग्रवाल आधी सलामीला यायचा. पण आता संघाच्या गरजेनुसार त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कॉ़म्प्युटर कोचिंगपासून आशिष नेहरा लांब

सध्याच्या जमान्यात कोचिंग स्टाफ कॉम्प्युटरवर आकड्यांचा अभ्यास करताना दिसतो. हे सर्व मॅचच्या आधी केलं जातं. सामन्यादरम्यान कॅप्टन मैदानावरील स्थितीनुसार काम करतो. अनेक असेही कोचेस आहेत, जे कॉम्प्युटर कोचिंगपासून लांब रहातात. गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहराचं नाव त्यात येतं. त्याला कधीही कॉ़म्प्युटरच्या मदतीने काम करताना बघितलेलं नाही. आशिष नेहरा अनेकदा बाऊंड्रीच्या जवळ उभा राहून गोलंदाजांना समजावताना दिसतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें