RCB vs PBKS IPL 2022: आधी बेयरस्टो मग लिव्हिंगस्टोन, एकदम कडक बॅटिंग, फक्त काही मिनिटात पहा IPL 2022 मधील धडाकेबाज बॅटिंग

RCB vs PBKS IPL 2022: 101 धावांवर जॉनी बेयरस्टो तंबुत परतला. त्यानंतर लियाम लिव्हिंस्टोनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी करुन आरसीबीच्या गोलंदाजांना हतबल करुन सोडलं.

RCB vs PBKS IPL 2022: आधी बेयरस्टो मग लिव्हिंगस्टोन, एकदम कडक बॅटिंग, फक्त काही मिनिटात पहा IPL 2022 मधील धडाकेबाज बॅटिंग
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 9:43 PM

मुंबई: पंजाब किंग्सने ‘करो या मरो’ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (PBKS vs RCB) विजयासाठी डोंगराएवढ लक्ष्य दिलं आहे. RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण गोलंदाजांना आपल्या कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. सलामीला आलेल्या जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि शिखर धवनने (Shikhar dhawan) पहिल्या ओव्हरपासून आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात पंजाब किंग्सने 1 बाद 83 धावा केल्या. जॉनी बेयरस्टोने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याने 29 चेंडूत 66 धावा चोपल्या. यात 4 चौकार आणि सात षटकार होते. शिखर धवनही दुसऱ्याबाजूने त्याला चांगली साथ देत होता. तो 21 धावांवर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.

लियाम लिव्हिंगस्टोनने लांब लांब मारलेले SIX इथे क्लिक करुन पहा

हे सुद्धा वाचा

लिव्हिंगस्टोनने ख्यातीप्रमाणे धुतलं

भानुका राजपक्षे आज लवकर अवघ्या 1 रन्सवर आऊट झाला. 101 धावांवर जॉनी बेयरस्टो तंबुत परतला. त्यानंतर लियाम लिव्हिंस्टोनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी करुन आरसीबीच्या गोलंदाजांना हतबल करुन सोडलं. लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावा चोपल्या. यात पाच चौकार आणि 4 षटकार होते. लिव्हिंगस्टोनने त्याच्या ख्यातीप्रमाणे लांबच लांब सिक्स मारले. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर पंजाबने RCB समोर विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

तुम्ही पहात बसाल, अशी जॉनी बेयरस्टोची धमाकेदार बॅटिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

पॉइंटस टेबलमध्ये सध्या दोन्ही संघ कुठे आहेत?

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्समध्ये सामना सुरु आहे. आयपीएल 2022 मधला हा 60 वा सामना आहे. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी पंजाब आणि बँगलोर दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. प्लेऑफमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पंजाबला आज जिंकावचं लागेल. आरसीबीने हा सामना जिंकला, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग थोडा सुकर होईल. पॉइंटस टेबलमध्ये 7 विजयासह आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्सचा संघ 5 विजयासह 8 व्या स्थानावर आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.