AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर; सूर्यकुमार यादव स्क्वॉडमध्ये सामील, सुनील गावसकर म्हणतात…

Suryakumar Yadav joins Mumbai Indians : मुंबई इंडियन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघात सामील झाला आहे.

IPL 2022 : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर; सूर्यकुमार यादव स्क्वॉडमध्ये सामील, सुनील गावसकर म्हणतात...
मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाला सूर्यकुमार यादवImage Credit source: Twitter/MI
| Updated on: Mar 27, 2022 | 10:44 AM
Share

Suryakumar Yadav joins Mumbai Indians : मुंबई इंडियन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघात सामील झाला आहे. सूर्यकुमार पहिला सामना खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. तर दुसऱ्या सामन्यातून खेळण्याची शक्यता अधिक आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक व्हिडिओ (Video) शेअर करून सूर्यकुमार यादव संघात सामील झाल्याची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये, सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने गेल्या काही वर्षांत जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफींसोबत पोज देताना दिसत आहे. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यापासून मैदानाबाहेर होता. त्या सामन्यात त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडावे लागले आणि पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जावे लागले.

भारतीय संघातील स्थान निश्चित करण्याची उत्तम संधी

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना विश्वास आहे, की या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारताच्या T20 संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमारसाठी IPL 2022 हे योग्य व्यासपीठ आहे. गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले, की सूर्यकुमार यादवसाठी गेले काही मोसम खूप छान राहिले. आयपीएल 2022 त्याला भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी या हंगामात पुन्हा चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी देईल.

आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून असेल निवड

गावसकर पुढे म्हणाले, की टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड ही आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार्‍या संघात निवड होण्याची शक्यता वाढवण्यासाठी सूर्यकुमार यादवला ही चांगली संधी मिळाली आहे.

आणखी वाचा :

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतरही चमकला ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी

PBKS vs RCB : आता कर्णधार नाही, तर फलंदाज! नवं पर्व, नवं लक्ष्य..! IPL 2022मध्ये काय चमत्कार करणार Virat Kohli?

DC vs MI : बेबी डिव्हिलियर्स-टीम डेव्हिडवर सर्वांच्या नजरा, अशी असेल दिल्लीविरुद्ध Mumbai Indians ची Playing XI

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.