AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | महेंद्रसिंह धोनी लखनऊ विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही? सामन्याआधी मोठी अपडेट

महेंद्रसिंह धोनीला गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात विकेटकींपिग करताना दुखापत झाली होती. धोनीने डाईव्ह मारल्यानंतर त्याला वेदन होता असल्याचं चेहऱ्यावरुन दिसून येत होतं. धोनीने पटकन आपले पाय धरले होते.

IPL 2023 | महेंद्रसिंह धोनी लखनऊ विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही? सामन्याआधी मोठी अपडेट
| Updated on: Apr 03, 2023 | 4:00 PM
Share

तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील सहावा सामना आज 3 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जांयट्स यांच्याच होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईचं होम ग्राउंड असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. लखनऊचं कर्णधारपद हे केएल राहुल याच्याकडे आहे. तर महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. धोनीचं हे आयपीएलमधील अखेरचं पर्व असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या ‘कॅप्टन कूल’ याला होमग्राउंडवर पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. यासाठी कित्येक चाहत्यांनी दुप्पट-तिप्पट किंमतीत तिकीटं खरेदी केली आहेत. मात्र या उत्साही चाहत्यांचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. धोनी या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

नक्की काय झालंय?

चेन्नईने या मोसमातील पहिलावहिला सलामीचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला. धोनीला या पहिल्या सामन्यातच दुखापत झाली. गुजरात टायटन्सच्या बॅटिंगमधील 19 वी ओव्हर दीपक चाहर टाकत होता. धोनीने याच ओव्हरमध्ये उडी मारत चौकार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली. धोनीला असह्य वेदना जाणवत होत्या. धोनीवर ताबडतोब फिजिओंकडून प्राथमिक उपचार करण्यात आले.

धोनी खेळणार की नाही?

“धोनी पूर्णपणे ठीक आहे. चिंता करण्याचं कारण नाही. धोनी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरतोय. लखनऊ विरुद्ध धोनीला मुकावं लागेल, असं कोणतंही कारण नाही”, अशी प्रतिक्रिया चेन्नईच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिली.

दरम्यान चेन्नईला आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात पराभवाने करावी लागली. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. चेन्नईने विजयााठी दिलेल्या 179 धावांचं लक्ष्य गुजरातने 4 बॉलआधी पूर्ण करत 5 विकेट्स विजय मिळवला होता.

आयपीएल 2023 साठी टीम सीएसके

महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....