AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill | शुबमन गिल याची विस्फोटक खेळी, लखनऊच्या गोलंदाजांचा धूर काढला

गुजरात टायटन्स टीमचा स्टार फलंदाज शुबमन गिल याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपल्या बॅटने आग ओकली. शुबमनने लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांचा चांगला धुर काढत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Shubman Gill | शुबमन गिल याची विस्फोटक खेळी, लखनऊच्या गोलंदाजांचा धूर काढला
| Updated on: May 07, 2023 | 7:39 PM
Share

अहमदाबाद | गुजरात टायटन्स टीमचा युवा आणि स्टार सलामी फलंदाज शुबमन गिल याने लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदांजांचा चांगलाच घाम काढला. आयपीएल 16 व्या मोसमातील 51 वा सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने होते. शुबमनने या 51 व्या सामन्यात नाबाद 94 धावांची विस्फोट खेळी केली. शुबमनने या खेळीत चौकारांपेक्षा अधिक षटकार ठोकले. तसेच शुबमन दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये शतक ठोकण्यापासून मुकला. असं जरी असलं, तरी शुबमन याने गुजरात टायटन्ससाठी मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे.

शुबमनने लखनऊ विरुद्ध 51 बॉलमध्ये 2 चौकार आणि 7 खणखणीत कडक सिक्स ठोकले. शुबमनने अशा प्रकारे 94 धावांनी नाबाद खेळी केली. गिल यासह गुजरातकडून एका डावात सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला. गिलने डेव्हिड मिलर याचा रेकॉर्ड ब्रेक केला. डेव्हिड मिलरने आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध एका डावात 6 सिक्स ठोकले होते.

गिल दुसऱ्यांदा नर्व्हस नाईंटीचा ‘बळी’

दरम्यान शुबमन गिल हा आयपीएल कारकीर्दीत दुसऱ्यांना शतक ठोकण्यापासून वंचित राहिला आहे. दुर्देवी बाब म्हणजे शुबमन या सामन्यात 94 धावांवर नाबाद राहिला, त्यामुळे अवघ्या 6 धावांपासून त्याचं शतक हुकलं. तर गिलने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये 96 रन्स केल्या होत्या, त्यामुळे त्याचं शतक ठोकण्याचं स्वप्न हे फक्त 4 धावांनी अधुरं राहिलं होतं.

ऑरेन्ज कॅपसाठी कडवी झुंज

शुबमनला या 94 धावांच्या खेळीमुळे ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत मोठा फायदा झाला आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅट्समनला ऑरेन्ज कॅप दिली जाते. तर मोसमादरम्यान जसे ज्या बॅट्समनच्या धावा जास्त होतात, त्यानुसार ऑरेन्ज कॅपची अदलाबदल होते, मात्र ते तात्पुरत्या स्वरुपात असतं.

शुबमनने या सिजनमध्ये आतापर्यंत एकूण 11 सामन्यांमध्ये 143.42 च्या स्ट्राईक रेट आणि 46.90 सरासरीने 469 धावा केल्या. शुबमनची या सिजनमध्ये 94 नाबाद ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

गुजरात प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान आणि आवेश खान.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.