IPL 2023 सुरु होण्याआधी धोनीच्या CSK ला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज OUT

IPL 2023 सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका बसला आहे. त्याचा वेगवान गोलंदाज इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सीजनला मुकणार आहे. पुढचे 3 ते 4 महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे.

IPL 2023 सुरु होण्याआधी धोनीच्या CSK ला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज OUT
csk Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 11:21 AM

चेन्नई : IPL 2023 सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका बसला आहे. त्याचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सीजनला मुकणार आहे. बॅक स्ट्रेस फ्रॅक्चकमुळे काइल जेमिसनवर शस्त्रक्रिया होणार आहे. पुढचे 3 ते 4 महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. त्यामुळे IPL 2023 मध्ये त्याच्या खेळण्याची शक्यता मावळली आहे. ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावेळी काइल जेमिसन न्यूझीलंड टीममध्ये पुनरागमन करु शकतो. काइल जेमिसनची जागा कोण घेणार? ते लवकरच सीएसकेकडून जाहीर करण्यात येईल.

हेड कोच काय म्हणाले?

काइलने डॉक्टरांची भेट घेतली. या आठवड्याच्या अखेरीस त्याच्यावर शस्त्रक्रिया होईल. “काइलसाठी हा आव्हानात्मक काळ आहे. आमच्यासाठी सुद्धा हे मोठं नुकसान आहे. तो न्यूझीलंड टीममध्ये असतो, तेव्हा टीमला बळकटी मिळते, वातावरण आनंदी असतं” असं न्यूझीलंड टीमचे हेड कोच गॅरी स्टीड म्हणाले.

दुसऱ्या फ्रॅक्चरबद्दल कधी सजमलं?

काइल जेमिसन जून महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. इंग्लंड टूरवर त्याला पहिल्यांदा पाठदुखीचा त्रास झाला होता. सध्या इंग्लंडची टीम न्यूझीलंड दौऱ्यावर आली आहे. तो या मालिकेत खेळणार होता. पहिल्या कसोटीआधी तपासणी करण्यात आली. त्यात सेकंड फ्रॅक्चर झाल्याच समोर आलं. दुखापतीच अजून योग्य निदान व्हाव यासाठी जेमिसन ख्राइस्टचर्च येथे जाणार आहे. CSK ला जाहीर करावा लागेल पर्यायी खेळाडू

काइल जेमिसनला आयपीएल 2022 च्या मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याची बेस प्राइसच तितकी होती. काइल जेमिसच्या जागी सीएसकेला आता पर्याय खेळाडू जाही करावा लागेल. काइल जेमिसनला आयपीएल 2022 मध्ये खेळला नाही. पण आयपीएल 2021 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला होता. आयपीएल 2021 मधील तो महागडा गोलंदाज होता.

Non Stop LIVE Update
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.