IPL 2023 LSG vs DC : लखनऊ संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर 50 धावांनी विजय, ‘हे’ दोन खेळाडू पडले दिल्लीवर ‘भारी’

आयपीएलमधील तिसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभवाची धूळ चारली आहे. दिल्लीचा पराभव करत लखनऊ संघाने आपलं विजयाचं खातं उघडलं आहे.

IPL 2023 LSG vs DC : लखनऊ संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर 50 धावांनी विजय, 'हे' दोन खेळाडू पडले दिल्लीवर 'भारी'
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 11:54 PM

मुंबई : आयपीएलमधील तिसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभवाची धूळ चारली आहे. लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाचा डाव निर्धारित 20 षटकात 143 धावांवर आटोपला. दिल्लीच्या पराभवाला लखनऊ संघाचे दोन खेळाडू भारी पडले. त्यातील एकाने बॅटींग तर एकाने बॉलिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे संघाने विजयाचा श्रीगणेशा केला आहे.

काइल मेयर्स याची 73 धावांची वादळी खेळी, निकोलस पूरन 36 धावा आणि त्यानंतर मार्क वुडचा घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर लखनऊने लीगमधील पहिला विजय साकारला आहे. लखनऊ संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 56 धावांचा अर्धशतकी खेळी केली. त्यासोबतच रिली रोसो याने 30 धावा केल्या. या दोन फलंदाजांना सोडलं तर इतर कोणत्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

लखनऊच्या मार्क वुडने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं, त्याने पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेत दिल्लीची आघाडीची फळी उद्ध्वस्त करून टाकली.  सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सरफरजा खान, चेतन साकरिया आणि अक्षर पटेलला त्याने बाद केलं.

लखनऊ सुपर जायन्ट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (W), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.