AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wriddhiman Saha DRS | 11 पैकी एकट्याचीच जोरदार अपील, ऋद्धीमान साहा याचा धोनी पेक्षा भारी डीआरएस

गुजरात टायटन्स टीमने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. महेंद्रसिंह धोनी जशी हुशारी स्टंपमागे विकेटकीपिंग करताना दाखवतो, त्यापेक्षा जास्त हुशारी आणि चलाखपणा साहा याने दाखवला. पाहा त्याने काय केलं.

Wriddhiman Saha DRS | 11 पैकी एकट्याचीच जोरदार अपील, ऋद्धीमान साहा याचा धोनी पेक्षा भारी डीआरएस
| Updated on: Apr 14, 2023 | 2:30 AM
Share

मोहाली | गुजरात टायटन्स टीमने पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने पराभव केला. गुजरातचा हा या मोसमातील 4 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 154 धावांचं आव्हान गुजरातने 1 चेंडू राखून 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गुजरातच्या विजयाचा शुबमन गिल हा शिल्पकार ठरला. शुबमन याने 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर शेवटच्या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर फोर मारत गुजरातला विजयी केलं. या दोघांशिवाय ऋद्धीमान साहा याने 30 धावा केल्या. मात्र साहा याने विकेटकीपिंग करताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यापेक्षा अधिक हुशारी दाखवली. साहा याने जे केलं, ते गुजरातच्या इतर 10 खेळाडूंना समजलं पण नाही. साहाच्या या हुशारीचा गुजरातला मोठा फायदा झाला.

नक्की काय झालं?

गुजरातने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबची निराशाजनक सुरुवात झाली. प्रभासिमरन सिंह शू्न्य आणि कॅप्टन शिखर धवन 8 धावांवर आऊट झाले. यानंतर मॅथ्यू शॉर्ट याने पंजाबचा डाव सावरला. जितेश शर्मा ही सेट झाला.

मोहित शर्मा गुजरातच्या डावातील 13 वी ओव्हर टाकायला आला. मोहितने जितेशचा काटा काढला, याता साहाचा मोठा वाटा राहिला. साहाने कॅप्टन हार्दिक पंड्या याच्याकडे डीआरएस घेण्यासाठी हट्ट केला कारण त्याला स्वत:च्या कानावर विश्वास होता.

मोहित शर्मा याच्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर जितेश आऊट झाला. ऑफ स्टंपवर टाकलेला बॉलवर बॅट्समन जितेश याने बॅक फुटवरुन पंच शॉट मारण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटला हलका स्पर्श करत विकेटकीपर साहाच्या दिशेने गेला. साहाने कॅच अचूक पकडली. साहाने कॅचसाठी अपील केली. मात्र अंपायरने नॉट आऊट दिलं.

ऋद्धीमान साहा याचा सतर्कपणा

साहाचा हट्ट आणि त्याचा विश्वास पाहू अखेरच्या सेंकदाला कॅप्टन हार्दिक याने रिव्हीव्यू घेतला. यात थर्ड अंपायरने अल्ट्रा एजमध्ये पाहिल्यानंतर बॅटला बॉलचा स्पर्श झाल्याचं दिसून आलं. साहाच्या विश्वासामुळेच गुजरातला आणि मोहित शर्मा याला ही विकेट मिळाली. अशा प्रकारे जितेश 25 धावांवर आऊट झाला.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.