PBKS vs GT | राहुल तेवतियाचा फिनिशिंग टच, थरारक सामन्यात चौकार ठोकत गुजरातला जिंकवलं
आयपीएल 16 व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. गुजरातने अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला.

मोहाली | गुजरात टायटन्सने पंजाब किंग्स टीमवर सामन्याच्या शेवटून दुसऱ्या चेंडूवर विजय मिळवला. राहुल तेवतिया या मॅच फिनिशर फलंदाजाने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने गुजरात टायटन्सला सामना जिंकून दिला. तेवतियाने सॅम करनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपद्वारे चौकार ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला. पंजाबने गुजरातला विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. शुबमन याने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. ऋद्धीमान साहा याने 30 धावांची उपयुक्त खेळी केली. साई सुदर्शन याने 19 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या 8 धावांवर आऊट झाला. तर डेव्हिड मिलर आणि राहुल तेविया या जोडीने गुजरातला विजयापर्यंत पोहचवलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात तेवतिया याने सॅम कुरने याच्या बॉलिंगवर चौकार ठोकला आणि गुजरातला 1 बॉलआधी विजय मिळवून दिला.
मिलर याने नाबाद 17 धावा केल्या. तर तेवतिया याने 2 बॉलमध्ये 5 पण निर्णायक आणि विजयी धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा, हरप्रीत बर्रार आणि सॅम करन या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
विजयी क्षण
?? ??? ????!@rahultewatia02 does a Rahul Tewatia‼️
He smashes the winnings runs for @gujarat_titans ? ?
Scorecard ▶️ https://t.co/RkqkycoCcd #TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/LMLGnRn7Kd
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2023
पंजाब किंग्सची बॅटिंग
दरम्यान त्याआधी गुजरातने टॉस जिंकून पंजाब किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. पंजाबकडून सलामी जोडीचा अपवाद वगळता मीडल ऑर्डरमधील सर्व फलंदाजांना अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र यापैकी एकालाही टॉप गिअर टाकत फटकेबाजी करण्यात अपयश आलं.
पंजाबकडून मॅथ्यू शॉट याने सर्वाधिक 36 धावा केल्या. जितेश शर्मा याने 25 रन्स केल्या. सॅम करन आणि शाहरुख खान या दोघांनी प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षा याने 20 रन्स केल्या. गुजरातकडून मोहित शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर राशिद खान, अल्जारी जोसेफ, जोशवा लिटील आणि मोहम्मद शमी या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.
