KKR vs SRH IPL 2023 | हैदराबादसाठी हॅरी ब्रूक ठरला संकटमोचक, ठोकलं मोसमातलं पहिलं शतक

आयपीएल 2023 मधल्या पहिल्या शतकाची नोंद झाली आहे. सनराईजर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकनं पहिलं शतक ठोकलं आहे. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादला 200 धावांचा पल्ला गाठता आला.

KKR vs SRH IPL 2023 | हैदराबादसाठी हॅरी ब्रूक ठरला संकटमोचक, ठोकलं मोसमातलं पहिलं शतक
KKR vs SRH IPL 2023 | हैदराबादसाठी हॅरी ब्रूक ठरला संकटमोचक, ठोकलं मोसमातलं पहिलं शतकImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 9:37 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिल्या शतकाची नोंद झाली आहे. सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात शतकी खेळी पाहायला मिळाली. हैदराबादच्या हॅरी ब्रूक नाबाद 100 धावांची खेळी केली. त्याने 55 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आयपीएलमधलं पहिलं शतकं ठोकलं. सनराईजर्स हैदराबादनं सर्वात महागडी बोली लावत हॅरी ब्रूकला आपल्या संघात घेतलं होतं. डिसेंबर 2022 मध्ये 13.25 कोटींची बोली लावली होती. या वादळी खेळीसह हैदराबादनं कोलकात्यासमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं आहे.

आयपीएलच्या 15 व्या आणि 16 व्या मोसमात इंग्लंडच्या खेळाडूंनी धमाका केला होता. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील पहिलंवहिलं शतक हे राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर यांनी केलं होतं. तर यंदा हॅरी ब्रूक याने शतक ठोकलंय. यापूर्वी शिखर धवनने 99 धावांची खेळी केली होती.

हैदराबादचा डाव

हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी चांगली खेळी केली. तर हॅरी ब्रूकने आक्रमक खेळी केली. पण 9 धावांवर असताना मयंक अग्रवाल बाद झाला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीने त्याचा झेल घेतला.  त्यानंतर राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. दोन चौकार मारल्यानंतर आंद्रे रसेलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ब्रूक आणि मार्करमनं हैदराबादचा डाव सावरला.  मार्करमने आक्रमक फटकेबाजी करत 50 धावा ठोकल्या. पण उत्तुंग फटका मारताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

अभिषेक शर्माने मैदानात येत आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने  17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. मात्र आंद्रे रसेलच्या गोलंदाजी झेलबाद झाला. त्यानंतर ब्रूक्सन मोर्चा सांभाळला आणि शतकी खेळी केली. त्याने 55 चेंडूत 100 धावा केल्या.

दोन्ही संघाचे खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.