AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI | ‘कोणी माझ्या आई-बहिणीबद्दल….’ वेस्ट इंडिज दौऱ्याआधी Yashasvi Jaiswal चा धक्कादायक खुलासा

IND vs WI | यशस्वी जैस्वाल IPL 2023 मधील स्टार प्लेयर आहे. त्याचा आयपीएलमधील फॉर्म लक्षात घेऊन वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजसाठी त्याची निवड केलीय. यशस्वीने एका मुलाखतीत चक्रावून टाकणारा खुलासा केलाय. अजिंक्य रहाणे त्या मॅचमध्ये कॅप्टन होता.

IND vs WI | 'कोणी माझ्या आई-बहिणीबद्दल....' वेस्ट इंडिज दौऱ्याआधी Yashasvi Jaiswal चा धक्कादायक खुलासा
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 02, 2023 | 1:13 PM
Share

मुंबई : टीम इंडिया 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच T20 सामने खेळणार आहे. टीम इंडियाने सर्व फॉर्मेटमधील सीरीजसाठी 2019 मध्ये शेवटचा वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. त्यावेळी प्रत्येक फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. यावेळी टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी दिलीय. या दरम्यान एका युवा खेळाडूने मैदानावर होणाऱ्या स्लेजिंगबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा केलाय.

IPL 2023 चा स्टार यशस्वी जैस्वालचा वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियात समावेश केलाय. जैस्वालच मागच्यावर्षी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात खेळताना स्वत:वरच नियंत्रण सुटलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

अजिंक्य रहाणे त्या मॅचमध्ये कॅप्टन

जैस्वालला अजिंक्य रहाणने मैदानाबाहेर पाठवून दिलं होतं. त्या घटनेबद्दल आता यशस्वी जैस्वालने द लल्लनटॉपमध्ये खुलासा केलाय. “आक्रमकता महत्वपूर्ण आहे. मी मानसिक दृष्ट्या आक्रमक आहे. अनेकदा ही आक्रमकता बाहेर येते. त्यावेळी मी जास्त काही बोललो नव्हतो. काहीवेळा अशा गोष्टी घडतात, त्याबद्दल बोलून काय फायदा” असं यशस्वी जैस्वाल म्हणाला.

‘….तर मी थोडी ऐकून घेईन’

यशस्वी जैस्वालला स्लेजिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तो म्हणाला की, “हे सगळ्यांसोबत घडतं. अनेकदा याबद्दल कोणाला काही समजत नाही. कोण काय बोलतं? यावर बरच काही अवलंबून असतं. कोणी मला माझ्या आई-बहिणीबद्दल बोललं, तर मी थोडी ऐकून घेईन” असं यशस्वी म्हणाला. दोन्ही देशांमधील 100 वा कसोटी सामना

टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला दोन टेस्ट मॅचने सुरुवात होणार आहे. 2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलची सुरुवात होईल. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये 12 ते 16 जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना होईल. दुसरी टेस्ट मॅच 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये होईल. भारत आणि वेस्ट इंडिजमधला दुसरा कसोटी सामना हा दोन्ही देशांमधील 100 वा कसोटी सामना आहे. ही टेस्ट सीरीज यशस्वी जैस्वालसाठी खूप खास आहे. त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होऊ शकतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.