IPL 2023 : RCB vs DC सामन्यात तिसऱ्या पंचांचा निर्णय चुकला ? Video पाहून तुम्हीच सांगा नेमकं काय ते
RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कमबॅक करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. तर दिल्लीला पाच सामन्यात विजयाचं खातं खोलता आलं नाही. पण या सामन्यात तिसऱ्या पंचांच एक निर्णय वादाचा ठरला.

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांना हा सामना महत्वाचा होता. बंगळुरुने हा सामना 23 धावांनी जिंकत स्पर्धेत कमबॅक केलं आहे. पण दिल्लीला इथून पुढे कमबॅक करणं कठीण आहे. गुणतालिकेचं गणित असं असताना या सामन्यातील एक विकेट वादाचं कारण ठरलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिसऱ्या पंचांची शाळा घेणं सुरु केलं आहे. विराट कोहलीने अर्धशतक ठोकत चांगली सुरुवात केली. मात्र तिसऱ्या पंचांच्या त्या निर्णयामुळे एका पाठोपाठ एक असे तीन गडी बाद झाले आणि बंगळुरुच्या धावसंख्येला खिळ बसली.
तिसऱ्या पंचांचा वादग्रस्त निर्णय!
दिल्ली कॅपिटल्सकडून 14 वं षटक अक्षर पटेलला सोपवण्यात आलं होतं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हर्षल पटेलनं उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खेळताना फटका हुकला आणि विकेटकीपर अभिषेक पोरेलनं स्टंप्स उडवले. अंपायरने स्टंपिंगसाठी तिसऱ्या पंचांना इशारा केला. पण नियमानुसार तिसऱ्या पंचांनी पहिल्यांदा कॅच रिप्ले दाखवला आणि वादाची ठिणगी पडली.
That’s hard for 3rd umpire (spikes everywhere ?) #RCBvDC pic.twitter.com/ppsYPk67aS
— Muthuvel tweets (@Muthuvelpandiy) April 15, 2023
रिप्लेमध्ये चेंडू हर्षल पटेलच्या बॅट जवळून जाताना दिसत आहे. तेव्हा चेंडू संपर्कात आल्याचं स्क्रिनवर दिसलं. पण चेंडू पास झाल्यानंतर ही स्निकोमीटरमध्ये तसंच दाखवत होतं आणि इथेच वाद सुरु झाला. तिसऱ्या पंचांनी हर्षल पटेलला बाद दिलं. पण सोशल मीडियावर वादाला फोडणी दिली जात आहे.
I don’t think this is fair, if they are checking for stumping 3rd umpire should just check the stumping and not caught behind they never appealed for it in the first place
— P (@HOLDENF4RD) April 15, 2023
There was a spike initially before the ball was anywhere near the bat and 3rd umpire still went with the spike? #RCBvDC
— Rohit (@Nimma_Rohit) April 15, 2023
हर्षल पटेल बाद झाल्यानंतर दोन गडी झटपट बाद झाले. हर्षल पटेल बाद झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. त्यानंतर आलेला दिनेश कार्तिकही काही खास करु शकला नाही. पहिल्याच चेंडूवर झेल बाद होत तंबूत परतला. 132 वर 3 गडी बाद अशी स्थिती असताना पुढच्या तीन चेंडूत 132 वर 6 गडी अशी स्थिती निर्माण झाली. बंगळुरुने 6 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. दिल्लीचा संघ 9 गडी बाद 151 धावा करू शकला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन) : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाख.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान
