DC vs GT : ऋषभ पंतचा झंझावात, अक्षर पटेलचं अर्धशतक, गुजरातसमोर 225 धावांचं आव्हान

IPL 2024 DC vs GT 1st Innings Highlights In Marathi : दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याने 20 व्या ओव्हरमध्ये मोहित शर्माच्या बॉलिंगवर 31 धावा ठोकल्या.

DC vs GT : ऋषभ पंतचा झंझावात,  अक्षर पटेलचं अर्धशतक, गुजरातसमोर 225 धावांचं आव्हान
axar patel and rishabh pant ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 9:34 PM

कॅप्टन ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनी केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 225 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या जोडीने केलल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीला 200 पार मजल मारता आली आणि गुजरातसमोर तगडं आव्हान ठेवता आलं. दिल्लीकडून ऋषभ पंत 20 व्या ओव्हरपर्यंत नाबाद राहिला. पंतने 88 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल याने 66 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनीही छोटेखानी मात्र निर्णायक योगदान दिलं.

दिल्लीची बॅटिंग

गुजरातने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीच्या सलामी जोडीने आश्वासक आणि वेगवान सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर दिल्लीने 9 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स गमावल्या. पृथ्वी शॉ आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क या सलामी जोडीने 3.2 ओव्हरमध्ये 35 धावांची सलामी भागीदारी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्क 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ 11 धावा करुन माघारी परतला. तर शाई होप 5 धावांवर बाद झाला. त्यामुळे दिल्लीची स्थिती 5.4 ओव्हरमध्ये 3 बाद 44 अशी झाली. मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि कॅप्टन ऋषभ पंत या दोघांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर निर्णायक क्षणी डाव सावरत मोठी भागीदारी केली.

चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

दिल्लीची 3 बाद 44 अवस्था झाल्यानंतर पंत आणि पटेल या दोघांनी शानदार आणि गेमचेंजिग शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान पंत आणि पटेल या दोघांनी अर्धशतकं पूर्ण केली. मात्र नूर अहमद याने ही जोडी फोडली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 69 बॉलमध्ये 113 धावांची भागीदारी केली. अक्षरने 43 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांसह 66 धावा केल्या. अक्षरनंतर ट्रिस्टन स्ट्रब्स मैदानात आला. पंत आणि ट्रिस्ट्रन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 19 बॉलमध्ये नाबाद 67 धावांची विस्फोटक भागीदारी केली. पंतने 43 बॉलमध्ये 5 फोर आणि 8 सिक्ससह नॉट आऊट 88 धावा केल्या. तर ट्रिस्टननेही 7 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 26 धावांची अफलातून खेळी केली. गुजरातकडून संदीप वॉरियर याने 3 विकेट्स घेतल्या. तर नूर अहमदने 1 विकेट घेतली.

पटेल-पंतचा तडाखा

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियर.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.