IPL 2024 DC vs GT Live Streaming : दिल्ली-गुजरात यांच्यात कडवी झुंज, दोघांसाठी महत्त्वाचा सामना

Delhi Capitals vs Gujarat Titans Live Streaming : दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांची आयपीएलच्या 17 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे.

IPL 2024 DC vs GT Live Streaming : दिल्ली-गुजरात यांच्यात कडवी झुंज, दोघांसाठी महत्त्वाचा सामना
.shubman gill and rishabh pant, ipl 2024, gt vs dc,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 4:14 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहे. शुबमन गिल गुजरात टायटन्संच नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सची धुरा आहे. दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांचा या हंगामातील नववा सामना आहे. गुजरातने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर दिल्ली आठव्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे प्लेऑफच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असा आहे.

दिल्ली-गुजरात दुसऱ्यांदा आमनेसामने

आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांची आमनसेामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघांचा 17 एप्रिल रोजी आमनासामना झाला होता. तेव्हा दिल्लीने गुजरातला 89 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर दिल्लीने 90 धावांचं आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्यामुळे आता गुजरातचा दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये विजय मिळवून पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना केव्हा?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना 24 एप्रिल रोजी होणार आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना कुठे?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

दिल्ली कॅपिटल्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा, झाय रिचर्डसन, रिकी भुई, लिझाद विल्यम्स आणि इशांत शर्मा.

गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा, केन विल्यमसन, साई सुधरसन, शरथ बीआर, मानव सुथार, विजय शंकर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, सुशांत मिश्रा, जोशुआ लिटल, अभिनव मनोहर, जयंत यादव, उमेश यादव आणि मॅथ्यू वेड

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.