IPL 2024, DC vs GT : आयपीएल स्पर्धेत मोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत

| Updated on: Apr 24, 2024 | 10:30 PM

आयपीएल 2024 स्पर्धा बऱ्याच अंगाने खास आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले. तर काही विक्रम मोडीत निघाले आहेत. काही नकोसे विक्रमही या स्पर्धेत रचले गेले आहेत. गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माने आपल्या नावावर नकोसा विक्रम केला आहे.

IPL 2024, DC vs GT : आयपीएल स्पर्धेत मोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 40 सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी चुकीचा ठरवला. सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचे झटपट विकेट्स गेले. मात्र मधल्या फळीत कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी आक्रमक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 224 धावा केल्या. दरम्यान गुजरात टायटन्सचे गोलंदाज सपशेल फेल ठरले. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकला आहे. आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

मोहित शर्माने सर्वात महागडा स्पेल टाकला. 4 षटकात मोहित शर्माने 73 धावा दिल्या. तसेच एकही गडी बाद करता आला नाही. या स्पेलमुळे मोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम बासिल थंपीच्या नावावर होता. 2018 मध्ये बासिल थंपीने 4 षटकात 70 धावा दिल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा यश दयाल आहे. गुजरात टायटन्सकडून मागच्या पर्वात खेळताना त्याने 4 षटकात 69 धावा दिल्या होत्या.

मोहित शर्माने शेवटचं षटक टाकलं आणि या षटकात ऋषभ पंतने झोडला. ऋषभ पंतने चौकार आणि षटकार मारत 30 धावा केल्या आणि एक वाइड आला. शेवटच्या षटकात एकूण 31 धावा आल्या. आयपीएल सर्वाधिक वेळा 50 च्या वर धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही मोहित शर्मा आघाडीवर आहे. मोहित शर्माने 7 वेळा 50च्या वर धावा दिल्या आहेत. मोहम्मद शमीने 6 वेळा, भुवनेश्वर कुमारने 6 वेळा, ख्रिस जॉर्डनने 5 वेळा, तर उमेश यादवने 5 वेळा 50हून अधिक धावा दिल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.